आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात एस.टी.बस थांब्यावर महागड्या खाद्य वस्तूने ग्राहकांचे होते लूट…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा जिल्ह्यात एस.टी.बस थांब्यावर महागड्या खाद्य वस्तूने ग्राहकांचे होते लूट…

(अजित जगताप)

सातारा दि: सातारा जिल्ह्यात विविध प्रवासी दररोज प्रवासासाठी घराबाहेर पडतात. अशावेळी त्यांना जेवण व नाश्ता आणि पाण्यासाठी एस.टी. बस थांबा व हॉटेल धाब्यावर अवलंबून राहावी लागते. सध्या उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत आहेत. एसटी बस ही सर्वसामान्य माणसांसाठी आजही दळणवळणाचे साधन आहे. परंतु सध्या सातारा जिल्ह्यातील अनेक एस.टी. बस थांबे आहेत . या स्टॉलवर प्रवाशांना पंधरा रुपयांचे थंड पिण्याचे पाण्याची बाटली तीस रुपयाला विकतात. दहा रुपये किमतीचा वडा तीस रुपयाला विकला जातो. या एस टी बस थांबा असणाऱ्या हॉटेल व धाब्यांवर अक्षरशा आर्थिक लूट केली जाते.

वर्षानुवर्षे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागामार्फत त्याची कायदेशीरच्या तपासणी होत नाही. मूळ कंत्राटदार आणि त्याची देखभाल करणारे तिसरा कंत्राटदार असे तीन वाटेकरी हॉटेल व धाब्याच्या माध्यमातून राजेरोसपणाने दरोडा टाकत आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना इच्छा असूनही अशा एसटी बस थांब्यावरील महागडे खाद्यपदार्थ विकत घेणे परवडत नाही. सामान्य प्रवासी एस.टी.मधून अर्धे तिकीट असणारे महिलावर्ग व वयोवृद्ध आणि अपंग प्रवासी प्रवास करत असतात. त्यांना महागडे खाद्यपदार्थ घेणे परवडत नाही. फक्त सातारा जिल्ह्यात अशा धाबे व हॉटेलमधून लूट सुरू आहे. याबाबत राजकीय पक्षाचेही हितसंबंध गुंतल्यामुळे ते सुद्धा हा मूलभूत प्रश्न उपस्थित करत नाहीत. सध्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सामान्य माणसांच्या प्रश्नावर आवाज उठवतील. अशी अशी सामान्य एस.टी. प्रवाशांना वाटू लागलेली आहे. याबाबत प्रवासी संघटनेने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारावा अशी मागणी पुढे आलेले आहे. ——————————- फोटो –सातारा जिल्ह्यामध्ये महागडे खाद्यपदार्थ राजुर उसपणाने विक्री करणारे एस.टी बस थांबा, हॉटेल व ढाबा चर्चेचा विषय ठरला आहे.

2) साताऱ्यात स्पर्धा परीक्षा पुस्तक भेट देऊन डॉ.आंबेडकर जयंती साजरी होणार….

सातारा दि: महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना अधिकार दिले आहेत. तसेच जबाबदारी सुद्धा दिलेले आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी यंदाची डॉ .आंबेडकर जयंती ही स्पर्धा परीक्षेतील पुस्तके मोफत भेट देऊन साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेक मान्यवरांनी मनापासून स्वागत केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये एक महिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचबरोबर युगपुरुषांची संयुक्त जयंती साजरी होत आहे. सर्वधर्मसमभावाची भावना व्यक्त करून दलित, पद दलित व बौद्ध वस्तीमध्ये हा सण दिवाळी सारखा साजरा होतो. डी.जे., विद्युत रोषणाई ,सजावट, डॉल्बी व मनोरंजन आणि नाचगाणे या बाबींसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये जातात. या सर्व पैशाचा सकारात्मकरित्या उपयोग होत नाही. त्यापेक्षा वाड्या वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम राबवले हे सुद्धा गरजेचे आहे.
अनेक जणांना वर्गणी देताना सुद्धा आर्थिक हिशोब कोलमडून पडत असतो. काहीजण इतरांकडून वर्गणी गोळा करून आपल्या स्वतःचीच सोय करतात आणि नावाला उत्सव साजरी करतात. हे सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे. त्याबाबत टीका करणे योग्य नाही. परंतु, या सर्व खर्चाला फाटा देऊन स्पर्धा परीक्षेमध्ये गोरगरीब कष्टकरी दलित, पददलित आदिवासी व गरीब समाजाला सहभागी होता यावे. यासाठी स्पर्धा परीक्षेला लागणारी मार्गदर्शन पुस्तिका भेट म्हणून देण्यात येणार आहे.
लाखभर रुपये खर्च होणार असला तरी उद्योजक व रिपब्लिकन सेना महाराष्ट्राचे नेते श्री रमेश अनिल उबाळे व त्यांच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते स्वयंपूर्ण पुढे आलेले आहेत. रिपब्लिकन सेना राष्ट्रीय नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर, अमन आंबेडकर व महाराष्ट्राच्या रिपब्लिकन सेनेच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात मोफत पुस्तिका वाटण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
गोरगरीब व पदवीधर व स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा . असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. बॅनरने प्रतिमा उजळून निघत नाही. तर खऱ्या अर्थाने सामाजिक भान व जाणीव ठेवून केलेल्या कामच समाजापर्यंत पोहचवले जाते. हे सुद्धा यानिमित्त सिद्ध झाले आहे . या उपक्रमाचे फुले- शाहू- आंबेडकर चळवळ मनापासून राबवणाऱ्या भीमसैनिकांनी स्वागत केले आहे. सर्व जाती धर्मातील लोक यंदाच्या डॉक्टर आंबेडकर जयंतीला सहभागी होत असल्याने खऱ्या अर्थाने हा देशाचा उत्सव होत आहे. यावेळी सच्चा आंबेडकर अनुयायांनी सुद्धा जबाबदारीचे भान ठेवावे अशी ही विनंती त्यांनी केली आहे. या उपक्रमाबद्दल रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक अण्णा उबाळे, अँड संजय गायकवाड , जमीर भोसले, नंदकुमार वाघमारे, प्रेमानंद जगताप, आनंद फणसे, विशाल भोसले, नितीन रोकडे व मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

——————————————————

फोटो– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना श्री रमेश अनिल उबाळे (छाया– निनाद जगताप सायगाव)

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button