कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-स्वंयस्पूर्तीने शिवरस्ता मोकळा; शेतकऱ्यांच्या पुढाकाराने कामाला सुरुवात.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

स्वंयस्पूर्तीने शिवरस्ता मोकळा; शेतकऱ्यांच्या पुढाकाराने कामाला सुरुवात.

 अहिल्यानगर प्रतिनिधी राजकुमार इकडे

पारनेर (दि. ८, सुपा, अहिल्यानगर):
पारनेर तालुक्यातील रांजणगाव ते खडकवाडी तसेच पिंपरी गवळी ते अस्तगाव या शिवरस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाच्या अधिनियमांनुसार हे रस्ते रखडले असले तरी अलीकडे सरकारने तातडीने पावले उचलल्याने शिवरस्ते मोकळे करण्यास गती मिळाली आहे.
यामुळे शेतकरी वर्गाला शेतमालाच्या दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळाला असून, सर्वत्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दि. ७ रोजी रांजणगाव व पिंपरी गवळी परिसरातील शेतकरी बांधवांनी एकत्र येत स्वंयस्पूर्तीने सहमती दर्शवून सुमारे २ कि.मी. लांबीच्या शिवरस्त्याच्या कामाला सुरुवात केली. जिव्हाळा बंगला ते खडकवाडी आणि पिंपरी गवळी ते अस्तगाव या मार्गांवर काम हाती घेण्यात आले.
रांजणगावचे विद्यमान सरपंच महेश काका देशमुख यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून, शेतकऱ्यांच्या सहकार्याने शिवरस्ते मोकळे करण्यात आले. त्यानंतर तत्काळ रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी सुपा मंडलाधिकारी सौ. मांडगे मॅडम, संबंधित अधिकारी, तलाठी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच रांजणगावचे सरपंच महेश देशमुख, उपसरपंच शिवाजी शिंदे, माजी सरपंच शरद सरोदे, बंटी साबळे, बाबा जवक, चेअरमन अनिल जवक, नामदेव जवक, दिलीप जवक, मधुकर जवक, विशाल जवक, बबन जवक, विनोद जवक, लालासाहेब जवक तसेच पिंपरी गवळीचे नंदाराम मांडगे, कैलास मांडगे, चंदर मांडगे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या एकजुटीचे उदाहरण समोर आले असून, भविष्यात अशाच पद्धतीने गावविकासाची कामे गतीने पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button