वाई:-“एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा! धोम मंडळात १० एप्रिलला विशेष सुविधा शिबिर”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा! धोम मंडळात १० एप्रिलला विशेष सुविधा शिबिर”
वाई : नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलद मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने “छ. शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत विशेष सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर धोम मंडळ, ता. वाई येथे दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कमंडलू पंचक्रोशी महाविद्यालय येथे पार पडणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे, संजय गांधी व श्रावण बाल योजनांअंतर्गत लाभार्थी प्रकरणे, वारसनौंदी अर्ज, विविध नोंदी कमी करण्यासंबंधी अर्ज, उत्पन्न व जात प्रमाणपत्रांचे वितरण यांचा समावेश आहे.
तसेच किसान कार्ड (एम्प्टी स्टॉक) स्टॉल, आधार कार्ड अपडेटेशन, खाते उतारा व 7/12 उताऱ्यांचे वितरण अशा महत्त्वाच्या सेवाही या शिबिरात दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांची धावपळ टळून वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
या शिबिरास वाई उपविभागाचे मा. उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालय वाईचे मा. तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून महसूल विभागाच्या वतीने सर्व सेवा प्रभावीपणे पुरवण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची माहिती मंडळ अधिकारी श्रीकांत धनावडे यांनी दिली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




