आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-मातीशी नाळ जोडणारे उद्योजक श्री हनुमंत रांजणे

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-मातीशी नाळ जोडणारे उद्योजक श्री हनुमंत रांजणे.

– अजित जगताप

माणसाच्या मनामध्ये जिद्द व प्रेरणा आणि महत्वकांक्षा या तिन्ही गोष्टीचा संगम असेल तर निश्चितही डोंगर माथ्यावरही हिरवळ निर्माण करू शकतात. याची प्रचिती जावळी तालुक्यातील डोंगराळ भाग व महू धरणाचे धरणग्रस्त असलेल्या वहागांवचे सुपुत्र श्री हनुमंत रांजणे साहेब आणि त्यांचे कर्तबगार सुपुत्र श्री अभिजीत रांजणेसाहेब, त्यांची पत्नी संचालिका सौ सोनली रांजणे मॅडम यांनी दाखवून दिली आहे. मातीशी नाळ जोडणारे उद्योजक म्हणून श्री हनुमंत रांजणे साहेब यांनी करहर भागातील सुमारे अडीचशे तरुणांना महाराष्ट्रभर नोकरी व्यवसाय निमित्त संधी प्राप्त करून दिली आहे. सध्या साडेपाचशे तरुणांना रोजगार उपलब्ध केला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, नवी मुंबई शहर व महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात उन्नती आर्थिक परिवार प्रमुख म्हणून सध्या उन्नती फायनान्स, उत्कर्ष पतसंस्था, अर्थ फायनान्शिअल सर्विसेस, उत्कर्ष फिन अडवायझर आणि उन्नती फाउंडेशन अशा पाच संस्थांच्या माध्यमातून साडेसातशे कोटीपेक्षा अधिक व्यवसाय निर्मिती केलेली आहे. यासाठी त्यांची पत्नी सौ सोनाली हनुमंत रांजणे मॅडम , सुन सौ.आसावरी अभिजीत रांजणे, कन्या कुमारी अंकिता रांजणे यांचे खूप मोठे योगदान आहे. जावळी तालुक्यातील डोंगराळ व धरणग्रस्त वहागांव ते सानपाडा पंचतारांकित कार्यालय हा प्रवास म्हणजे थक्क करून टाकणार आहे. त्यांचे जन्मगाव असलेल्या जावळी तालुक्यातील धरणग्रस्त वहागांव येथील श्री भैरवनाथ मंदिर तसेच खंडाळा तालुक्यातील अजनूज येथील पुनर्वसित श्री भैरवनाथ मंदिराला सुद्धा त्यांनी भरीव सहकार्य केले आहे.
श्री हनुमंत बळवंत रांजणे म्हणजे नावातच हनुमंत सारखे उंच भरारी मारणारी व्यक्तिमत्व आहे.साधी राहणी, उच्च विचारसरणी म्हणतात तसे त्यांचे वागणे आहे. उद्योगाचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील कै. बळवंत गणपत रांजणे व कै. लक्ष्मीबाई बळवंत रांजणे यांच्याकडून मिळाले. वडिल जुने साहित्य खरेदी – विक्रीचा व्यवसाय व आई पोटाची भूक भागवणारी खानावळ चालवत होती. त्यातूनच माणुसकी आणि व्यावसायिक मार्गदर्शन त्यांना लाभले. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मान्यताप्राप्त एन बी एफ ची ‘उन्नती फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
मुंबई नगरी मधील लोअर परळ या ठिकाणी वहागांव येथील ३०-४० मंडळी प्रत्येकी शंभर ते पाचशे रुपये जमा करुन एखाद्या गरजवंताला कर्ज द्यायचे व नंतर व्याजासहित ते परत घ्यायचे. असा विश्वासू फंड होता. त्यातील बारकावे पाहूनच त्यांना पुढे श्रमिक सहकारी बँकेत कर्ज विभागात रुजू झाले. सुरुवातीच्या काळामध्ये ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक व वहागावकर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. गेल्या १० वर्षात १ लाखाहून अधिक महिलांना कर्ज दिले असून एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के आहे.कोरोनाकाळातही कंपनीने अनेक महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करुन हातभार लावला.
श्री रांजणेसाहेब बी. कॉम पदवीधारक असून बैंकिंग क्षेत्रातील अनेक पदव्या त्यांनी घेतलेली आहे. अनेक वित्तीय संस्था, बँका त्यांच्या भागीदार आहेत. मुंबई नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक भागात उन्नती आर्थिक परिवाराचे जाळे विणले गेले आहे. अर्थसहाय्य करून अनेकांना हातभार लावला त्यापुढे कंपनी आता सोने तारण कर्ज, लघु प्रॉपर्टी कर्ज, व्यवसाय कर्ज, मेडिक्लेम पॉलिसी या क्षेत्रात कार्यरत आहे. अलीकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाने कंपनीला पब्लिक लिमिटेड कंपनी करण्याचा परवाना दिला आहे. विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे उन्नती परिवार हे ब्रीदवाक्य ठरले आहे. या सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला अर्थसहाय्य, ग्रामीण भागातील सुख सुविधा निर्माण करण्यासाठी स्वखर्चाने देणगी व उपक्रम राबवले आहेत. सौ. सोनाली रांजणे यांचे ह भ प दत्तात्रय महाराज कळबे विद्यालय, दापवडी येथे प्राथमिक शिक्षण झाले. त्या शाळेला सुद्धा सभामंडप, आजोळ असलेल्या कावडी गावामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा यंत्रणा आणि प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या करहर या ठिकाणी भाविकांसाठी पत्राशेड उभारणीमुळे अनेक वारकऱ्यांना सावली मिळाली आहे.
त्यांचा चिरंजीव अभिजीत रांजणेसाहेब यांनी सुद्धा एम.बी.ए. शिक्षण पूर्ण करून आपले कौशल्य दाखवले आहे. श्री हनुमंत रांजणे साहेबांची कन्या परदेशामध्ये शिक्षण घेत आहे. श्री. रांजणे साहेब व्यक्ती नसून एक विचार बनले आहेत. नुकताच त्यांना धगधगती मुंबई साप्ताहिकाच्या वतीने उद्योजक पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कारापेक्षाही त्यांचे व्यक्तिमत्व खूप मोठे असल्याने आज त्यांच्या हात म्हणजे एक परीस झालेला आहे. ज्या ठिकाणी ते स्पर्श करतील त्या ठिकाणी निश्चितच सोने होणार असल्यामुळे बाजारपेठेत ही त्यांच्या शब्दाला किंमत आणि मानसन्मान आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये ६४ शाखेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख झाली आहे. खऱ्या अर्थाने जावळीच्या सुपुत्राने अनेकांना सावली मिळवून दिल्याबद्दल त्यांना दि:१० एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण भेट घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…….
—– श्री.अजित जगताप, सायगाव तालुका जावळी जिल्हा सातारा. 9922241299/9156140491

2) मेढा:-जावळीत वृक्षारोपणाद्वारे देशमुख यांनी केले रक्षाविसर्जन….

(अजित जगताप)
मेढा दि: जावळी तालुक्यात अंधश्रद्धेला फाटा देऊन वृक्षरोपणाद्वारे विभवी येथील देशमुख कुटुंबीयांनी दिवंगत श्रीकृष्ण राजाराम देशमुख यांच्या सावडण्याचा विधी वेळी अस्थिरात विसर्जन न करता वृक्षारोपणाच्या वाढीसाठी ही राख वापरात आणली आहे. याबद्दल परिवर्तनाची वाट सुरू केल्याबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.
जावळी महाबळेश्वर बाजार समिती सभापती स्व संपतराव राजाराम देशमुख व जावळी बँकेचे माजी चेअरमन यशवंतराव राजाराम देशमुख यांचे समरनाथ वडाचे झाड व गुलमोहर वृक्षाचे रोप लावून खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे बीज रोवले आहे.
या धार्मिक व परिवर्तनवादी कार्यक्रमाला
सरपंच कांताराम शिंदे, राजू जाधव ,पांडुरंग वाघ, पांडुरंग देशमुख ,तुकाराम नलवडे , बँकेचे संचालक रामचंद्र चिकणे, तुकाराम शिंदे, जावळी बाजार समिती चेअरमन जयदीप शिंदे बुवासाहेब पिसाळ, अनीसचे डॉ.दीपक माने रयत शिक्षण संस्थाचे कॉन्सिलिग सदस्य ॲड रवींद्र पवार ,अनिरुद्ध गाढवे ,राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस राजकुमार पाटील हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही मोबाईल दरे संपर्क साधून देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले.
जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव महेश देशमुख यांच्या कुटुंबाने आपले चुलते श्रीकृष्ण देशमुख यांचे निधनानंतर परंपरेला फाटा दिला . एक आदर्श निर्णय घेतला आहे. वेण्णा नदीत अस्थी विसर्जन न करता गावाच्या स्मशानभूमीत वडाचे झाड लावून त्या ठिकाणी अस्थी विसर्जित केल्या . तसेच जावली बाजार समितीचे माजी सभापती स्वर्गीय संपतराव देशमुख व चुलते जावळी बँकेचे माजी चेअरमन यशवंतराव देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ गुलमोहर व निलम मोहर झाडे लावली. या झाडांच्या देखभालीची जबाबदारी देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button