महाबळेश्वर:-“नाचून नाही, वाचून साजरी होणार जयंती!” — महाबळेश्वरात विचारांची ज्योत प्रज्वलित.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर:-“नाचून नाही, वाचून साजरी होणार जयंती!” — महाबळेश्वरात विचारांची ज्योत प्रज्वलित.

महाबळेश्वर : प्रतिनिधी उत्तम भालेराव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, भीम क्रांती लोक संघटना व जयंती उत्सव समिती महाबळेश्वर यांच्या वतीने महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून जयंती ही केवळ उत्सव न राहता विचारांची क्रांती ठरावी, असा ठाम संदेश देण्यात आला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी झाली पाहिजे,” या जहाल आणि प्रेरणादायी विचारांनी वातावरण भारावून गेले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड, महासचिव अनिल सकपाळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव, प्रकाश सपकाळ,सकाराम कदम तसेच समता सैनिक दलाचे संतोष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाज परिवर्तनाचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी ही जयंती ज्ञान, वाचन आणि जागृतीच्या माध्यमातून साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाबळेश्वरात यंदा जयंती उत्सव हा केवळ साजरा न होता, विचारांची चळवळ ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत या उपक्रमातून मिळत आहेत.




