आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे:-तळेगावात दुर्गंधीचा कहर! प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा.

पत्रकार अशोक आर्ते मावळ तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

तळेगावात दुर्गंधीचा कहर! प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा.

 तालुका प्रतिनिधी अशोक आर्ते

तळेगाव दाभाडे : तळेगाव–चाकण महामार्गावरील रेल्वे स्टेशन परिसरात, माउंट सेंट हायस्कूलसमोरील छोट्या पुलाजवळ सध्या गंभीर आरोग्यधोका निर्माण झाला आहे. येथील नाल्यात मोठ्या प्रमाणावर दूषित व मिश्रित पाणी सोडले जात असून त्यातून असह्य दुर्गंधी पसरत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे.


स्थानिकांच्या माहितीनुसार, या नाल्यात चिकन, मटण आणि मासांचे अवशेष टाकले जात असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. दुर्गंधीमुळे रहिवासी, शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काहींनी या परिस्थितीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.
या परिसरात गंगा रे रेसिडेन्सीसह अनेक निवासी सोसायट्या असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने संताप वाढत आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर ही समस्या तात्काळ सोडवली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
आता नगर परिषद आणि संबंधित विभाग या गंभीर प्रश्नाकडे किती तातडीने लक्ष देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button