कळंबी:-(पुसेसावळी)-“छोट्या पावलांचा मोठ्या स्वप्नांकडे झेप – कळंबीत ‘जल्लोष’चा रंगतदार सोहळा”
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कळंबी:-(पुसेसावळी)-“छोट्या पावलांचा मोठ्या स्वप्नांकडे झेप – कळंबीत ‘जल्लोष’चा रंगतदार सोहळा”

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील
कळंबी, ता.खटाव, जि.सातारा :
जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा कळंबी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘जल्लोष’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. “छोट्या पावलांचा मोठ्या स्वप्नांकडे” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम लवकरच रंगणार असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा बहारदार आविष्कार यात पाहायला मिळणार आहे.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांकडून नृत्य, नाटिका, गीत, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये कार्यक्रमाबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या आनंदोत्सवात पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.




