क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारती विदयापीठ:-(पुणे)-सराईत आरोपीकडुन घातपाताचा कट उधळला, सदर आरोपीकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राउंड जप्त.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भारती विदयापीठ:-(पुणे)-सराईत आरोपीकडुन घातपाताचा कट उधळला, सदर आरोपीकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राउंड जप्त.

 कात्रज शहर प्रतिनिधी अब्दुल रहीम शेख

दिनांक २३/०३/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप- निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की, कात्रज, गंधर्व लान्सचे पुढील समोरील रतन मोटर्सजवळील कात्रज घाटाकडे जाणा-या रोडवर एक इसम अग्नीशस्त्र घेवुन वावरत आहे. सदरची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नामे लक्ष्मण दगडु कचरे वय २२ वर्षे, रा. जैन मंदीराजवळ, सच्चाईमाता, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज, पुणे हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रु. किं.चे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राउंड सहीत मिळुन आला. त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत राउंड जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं ११०/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरी. पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, व संदीप आगळे यांनी केली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button