मायणी:-लिंगायत समाजाच्या १७ उपजातींचा केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट होणार•
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

लिंगायत समाजाच्या १७ उपजातींचा केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट होणार•
◻️”शिवा” संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या प्रयत्नांना आले यश ; नवी दिल्लीत केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना. रामदास आठवलेंची बैठक झाली असून 17 उपजाती केंद्राच्या ओबीसी यादी मध्ये समाविष्ट होणार आहेत अशी माहिती शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी दिली
🟠 ना : लिंगायत समाजांच्या वतीने शिवा संघटनेची बुधवार दिनांक 18 रोजी बैठक झाली
बुधवारी ( दि. १८ मार्च ) ला दिली. यासंबंधी त्यांची केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्यासोबत बैठक झाली. असून वीरशैव लिंगायत समाजाच्या ओबीसी यादीत उपजाती समाविष्ट करण्याच्या या लढ्याला समाछाचे पुढारी प्रा. मनोहर धोंडे यांना घवघवीत यश आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व देशभरातील विविध राज्यांतील वीरशैव लिंगायत समाजावतीने प्रा. धोंडे सरांचे अभिनंदन केले जात आहे.
🟠 नवी दिल्ली येथे बुधवार दि. १८ मार्च झालेल्या बैठकीनंतर बोलताना प्रा. मनोहर धोंडे सर म्हणाले की, आज केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत बैठक झाली. शिवा संघटनेमुळे लिंगायत समाजाच्या २५ जाती ओबीसीमध्ये आल्या आहेत. आता १७ उपजाती केंद्राच्या ओबीसी यादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतीत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. लवकरच १७ उपजाती ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासाठीच्या तांत्रिक बाबींची माहिती राज्याकडून मागवली आहे. या लिंगायत वीरशैव समाजातील १७ उपजाती महाराष्ट्रातील असून मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त व विदर्भातही आहेत, असे ते म्हणाले. या उपजाती ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्याव मोठा फायदा होणार आहे. आम्ही सुरुवातीपासून ओबीसीमध्ये जाण्यासाठी आग्रही आहोत असे प्रा. मनोहर धोंडे म्हणाले.
🟠 लिंगायत समाजातील या १७ उपजातींचा समावेश होणार आहे. या पुढीलप्रमाणे – १) लिंगायत वाणी २) लिंगायत तांबोळी ३) लिंगायत गुरव ४) लिंगायत जंगम ५) लिंगायत कुंभार ६) लिंगायत न्हावी ७) लिंगायत परीट ८) लिंगायत धोबी ९) लिंगायत फुलारी १०) लिंगायत सुतार ११) लिंगायत कुंभार १२) लिंगायत कानडी १३) लिंगायत पंचम १४) माला जंगम ( वीरभद्र ) १५) लिंगायत कोस्ती १६) लिंगायत देवांग १७) लिंगायत साळी या लिंगायत वीरशैव जातींचा समावेश करण्यात आला आहे.
🟠 या लिंगायत वीरशैव समाजाच्या आरक्षण न्याय हक्कासाठी समाजाचे खरे कार्यसम्राट लिंगायत वीरशैव पुढारी प्रा. मनोहर धोंडे सर यांनी जो लढा दिला व घवघवीत यश मिळविले त्याबद्दल “शिवा” संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. अभयआप्पा कल्लावार, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व मुंबई लिंगायत अध्यक्ष मा. रूपेशआप्पा होनराव, राज्याचे अध्यक्ष मा. मनिषराव पंधाडे, विदर्भ अध्यक्ष मा. गजाननराव वाजारे, मध्यप्रदेश छिंदवाडा जिल्हा अध्यक्षा सौ. विणाताई चेडगे, भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे, ‘शिवा” महिला संघटना नागपूरच्या अध्यक्षा सुकन्याताई थडकर, रामटेकचे अध्यक्ष राजेशराव कापसे तसेच लिंगायत समाजाचे चित्रपट दिग्दर्शक शिवराज वायचळ, अभिनेते उमेश मरडवार, पुणे येथील से. नि. अन्न व औषधी प्रशासन निरीक्षक विनोदराव अंदूलकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश चेडगे, विजयराव चेडगे, तुमसर ( भंडारा ) येथील माजी नगराध्यक्ष गिताताई कोंडेवार, नागपूरचे प्रशांत चेडगे, जयंत प्रभाकरराव चेडगे, लाखनीच्या से. नि. महसूल अधिकारी अश्विनी शेटे, कोंढाळी येथील प्रा. भारतीताई गोडबोले तसेच साकोलीचे राहूल अंदूलकर, आदित्य चेडगे, रवि लोखंडे आणि लिंगायत वीरशैव समाज वतीने प्रा. मनोहर धोंडे सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.




