“संगमनेर हादरलं! सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थिनीवर निर्घृण ॲसिड हल्ला”
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“संगमनेर हादरलं! सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थिनीवर निर्घृण ॲसिड हल्ला”

तालुका प्रतिनिधी संजय पगारे
संगमनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील वडगाव पान येथे मंगळवारी (दि. १७) दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. सहावीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीवर एका अज्ञात युवकाने ॲसिड हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती. याच वेळी रस्त्यात दबा धरून बसलेल्या आरोपीने तिच्यावर अचानक ॲसिड फेकून हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थिनीला तातडीने लोणी प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाकडून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
⚖️ संतापाची लाट
या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




