आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-उदगीरमध्ये रंगणार मराठी पत्रकारांचा महासंगम; राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ना.शिवेंद्रराजे भोसले.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

उदगीरमध्ये रंगणार मराठी पत्रकारांचा महासंगम; राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

१८–१९ एप्रिलला अधिवेशन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

सातारा :
देशभरातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या १८ व १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी ही घोषणा केली. या अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्यामुळे पत्रकारांच्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुमारे ८७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन दर दोन वर्षांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागांत आयोजित केले जाते. यापूर्वी रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव आणि नांदेड येथे अधिवेशन पार पडले आहे. यंदा उदगीर येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी आयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेच्या शिष्टमंडळाने स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले आणि स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य करत “मी नक्की येतो” असा शब्द दिला.
या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, लातूर विभागीय सचिव व अधिवेशनाचे प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे तसेच संयोजन समितीचे युवराज धोतरे आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकारांच्या दृष्टीने गौरवाचा सोहळा ठरणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनास देशभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले, मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे तसेच संयोजन समितीचे युवराज धोतरे यांनी केले आहे.
**
ना. शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष; साताऱ्याच्या मानाचा तुरा
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याने हा सातारा जिल्ह्यासाठी सन्मानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यात सातारा जिल्ह्याचे नेहमीच महत्त्वाचे योगदान राहिले असून जिल्ह्यातील पत्रकारांना परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र ठेवण्यात सातारा जिल्हा आघाडीवर राहिला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवडीचा सर्व पत्रकारांना अभिमान असल्याची प्रतिक्रिया पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी व्यक्त केली.
कोट
“राज्यातील पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन महत्त्वाची भूमिका बजावत असते. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे. देशभरातून सुमारे तीन हजार पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा असून त्यानुसार व्यवस्था करण्यात येत आहे.”
— एस. एम. देशमुख,
मुख्य विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, हरीश पाटणे, सचिन शिवशेट्टे व युवराज धोतरे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button