पुणे:-सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अंत.
पत्रकार योजना कामतकर सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष विधी सल्लागार

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अंत.

सोलापूर प्रतिनिधी योजना कामतकर
सोलापूर, (प्रतिनिधी): सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सतिश वळसंगकर (वय 72) यांचे गुरुवारी दुपारी 12 वाजता पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार पुणे येथे करण्यात येणार आहेत.
डॉ. वळसंगकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. तसेच ते सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण प्रसारक म्हणूनही परिचित होते. शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या हरिभाई देवकरण प्रशालेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
सहकार क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सोलापूर जनता बँकेचे ते अनेक वर्षे चेअरमन होते. तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांवर त्यांनी संचालक म्हणूनही काम केले होते.
काही दिवसांपासून ते पुण्यात मुलाकडे वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाने सोलापूर आणि पुणे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.




