शिरूर नगरपरिषद आयोजित: नारी सन्मान सोहळा २०२६
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूर नगरपरिषद आयोजित: नारी सन्मान सोहळा २०२६

शिरूर प्रतिनिधी गणेश बोऱ्हाडे
(जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम)
शिरूर नगरपरिषद परिसरातील सर्व माता-भगिनींना सस्नेह निमंत्रण!
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिरूर नगरपरिषदेच्या वतीने खास महिलांसाठी ‘नारी सन्मान सोहळा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सर्व महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा अतिशय रंगतदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे.
🗓️ दिनांक: उद्या, गुरुवार, १२ मार्च २०२६
📍 स्थळ: शिरूर नगरपरिषद सेंटर शाळा मैदान, जिजामाता गार्डन शेजारी, शिरूर.
🎤 प्रमुख निवेदक: प्रसिद्ध अभिनेता ओम यादव (यांच्या सुश्राव्य निवेदनातून आणि संवादातून या खेळाची रंगत अधिकच वाढणार आहे!)
🎁 स्पर्धेतील भव्य आणि आकर्षक बक्षिसे:
प्रथम बक्षीस: इलेक्ट्रिक गाडी
दुसरे बक्षीस: फ्रीज
तिसरे बक्षीस: LED टीव्ही
चौथे बक्षीस: कुलर
पाचवे बक्षीस: ज्युसर
सहावे बक्षीस: ज्वेलरी सेट
सातवे बक्षीस: डिनर सेट
आठवे बक्षीस: पैठणी साडी
नववे बक्षीस: पैठणी साडी
दहावे बक्षीस: मिक्सर
विशेष बक्षीस: ५१ भाग्यवान महिलांना आकर्षक बेडशीट
📺 एलईडी स्क्रीन सौजन्य:
पहिली स्क्रीन: रासने बंधू
दुसरी स्क्रीन: धरमचंद भवरीलाल सराफ
तरी शिरूर शहरातील जास्तीत जास्त माता-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून नगरपरिषदेने आयोजित केलेल्या ‘रंग पैठणीच्या’ या आनंददायी खेळात मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
श्रीमती ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे (नगराध्यक्षा)
श्री. प्रीतम लक्ष्मण पाटील (मुख्याधिकारी)
तसेच, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका, शिरूर नगरपरिषद.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



