पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बेकादेशीर आठवडे बाजारास पालिका अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा.
प्रतिनिधी:- कासाभाई मुलाणी :-9892191925

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बेकादेशीर आठवडे बाजारास पालिका अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा
दादा भाई याची हप्ते वसुली जोरात
अधिकृत व्यवसायिक कोमात
नवी मुंबई पनवेल प्रतिनिधी:- कासमभाई मुलाणी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये बेकायदेशीरपणे प्रत्येक दिवशी म्हणजेच आठवड्याचे 7 दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये ठरलेल्या व्यवसाईकांच्या वतीनेच (फेरीवल्याच्या ) मार्फत बेकायदेशीर आठवडे बाजार भरविला जात आहे याकरिता स्थानिक दादा ,भाई यांच्या कडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे हप्ता वसुली केली जात आहे हे सर्व पनवेल महानगरपालिका अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने घडत असल्याचे नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात चर्चिले जात आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवसाईकांनी नागरिकांनी स्वतःचे किवा भाडेत्त्वावर शॉप घेऊन शासनाचा टॅक्स भरून अधिकृत व्यवसाय सुरू केलेला असलेल्या व्यवसाईकांच्या व्यवसायावर बेकायदेशीर आठवडे बाजारामुळे नुकसान होऊन बँकेचे हप्ते व भाडे भरणे मुश्किल झाले आहे या सर्वस्वी पनवेल महानगरपालिकाच जबाबदार आहे तळोजा विभागात प्रत्येक सोमवारी सिडकोच्या जागेवर मोठया प्रमाणात बेकायदेशीर आठवडे बाजार भरूवला जाऊन लाखोंची हप्ता वसुली केली जात आहे बाजाराच्या दिवशी सर्व रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने स्थानिक नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे तसेच दुसऱ्याच दिवशी बाजार भरलेल्या विभागात कचऱ्याचे विद्रुपीकरनाचे दर्शन घडत आहे.याविरोधात परिसरातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांनी पनवेल महानगरपालिका विभागीय अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर बाजार बंद होण्याच्या वेळी अतिक्रमण विभागाची गाडी देखाव्या करिता बाजार भरला जातो. आशा ठिकाणी पोलिसांच्या साईनर प्रमाने भोगा वाजवून सुसाट निघून जात आहे. या बाबत नागरिकांच्या मध्ये तीव्र संताप पसरलेला आहे.याबत पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी लक्ष घालून बेकायदेशीर आठवडे बाजार बंद करून स्थानिक व्यवसायिकांना न्याय द्यावा अन्यथा सामाजिक कार्यकर्ते बेकायदेशीर आठवडे बाजाराच्या विरोधात आंदोलन छेडणार.