विधवामातांना मिळणारा सन्मान त्यांचे आयुष्य बदलून टाकणारा:- प्रा. रवींद्र कोकरे.
प्रतिनिधी:-अशितोष चव्हाण :-7378619519

विधवामातांना मिळणारा सन्मान त्यांचे आयुष्य बदलून टाकणारा : प्रा रविंद्र कोकरे
फलटण :
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभं करण्यासाठी असंख्य मावळ्यांना बरोबर घेत स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेला सुखाचे दिवस आणले त्याच प्रमाणे सस्तेवाडी गावचे सुपुत्र शिवराज शेठ कदम यांनी आपल्या गावातील सहकार्यांना बरोबर घेत गावाच्या विकासाचं काम हाती घेतल आहे. कर्त्या समाजसुधारकांप्रमाणे त्यांनी गावची शाळा ,मंदिरे आणि गावातील लोकांसाठी कृतिशील कार्य सुरू केले आहे. त्याचं हे कृतिशील समाजकारण गावाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल असे विचार प्रा रविंद्र कोकरे यांनी सस्तेवाडी ता फलटण येथे जानवी सामाजिक संस्थेच्या विविध उपक्रमांच्या सांगता कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले
शिवराज कदम मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात गावातील विधवांना सन्मानाची वागणूक देण्याच्या उद्देशाने शिवराज शेठ कदम यांच्या मुलाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त जाहीर कार्यक्रमात विधवा मातांच्या हस्ते चि शार्दुल कदम यांस औक्षण करण्यात आले यावेळी सासतेवाडी व कांबळेश्वर ग्रामस्थांनी प्रचंड टाळ्यांचा गजर केला. प्रा कोकरे पुढे बोलताना म्हणाले विधवा मातांचा आख्या गावासमोर केलेला हा सन्मान म्हणजे सस्तेवाडी गावासाठी ऐतिहासिक क्षण आहे विधवा मातांना मिळणारा हा सन्मान त्यांचे आयुष्य बदलून टाकणारा आहे . हा एक आदर्श उपक्रम असून प्रत्येकाने तो आमलात आणला पाहिजे
शिवराज कदम व सौ श्रुतिका कदम म्हणजे आजच्या जगातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आहेत माणूस मोठा झाला की गावाला विसरतो पण गावालाच आपलं कुटुंब मानणाऱ्या शिवराज कदम यांचे खूप आभार मानले पाहिजेत गावासाठी त्यांची चाललेली धडपड कौतुकास पात्र आहे .गावातील प्राथमिक शाळेसाठी तसेच माध्यमिक शाळेसाठी अनेक प्रकारचे साहित्य देऊन शैक्षणिक पातळी उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न गावातील विद्यार्थ्यांना सुखावणारे आहेत .
शिवराज कदम यांना मिळालेले साथीदार संतोष जाधव तानाजी पवार विश्वजित वाघ समाधान सस्ते सतिश लकडे तुषार कदम शशिकांत सूर्यवंशी त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना मदत करतात गावाच्या विकासा साठी तरुणांचा सहभाग कदम यांना महत्वाचा वाटतो
चि शार्दुल च्या वाढदिवसानिमित्त गावातील प्रत्येक व्यक्तीला कलमी आंबा , नारळ चिक्कू तसेच अनेक प्रकारची भारतीय वंशाची झाडे वाटण्यात आली या वेळी कोणताही केक न कापता फळांचे वाटप करण्यात आले शिवराज कदम यांनी गावातील मुलांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका बांधून देण्याचा संकल्प केला आहे त्या निमित्त या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी पुस्तके भेट देऊन अभ्यासिकेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे .
या वेळी सरपंच ज्ञानेश्वरी कदम उपसरपंच बापूराव शिरतोडे , तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सस्ते , आत्माराम सस्ते ,संजय कदम ,सुधाकर कदम ,रत्नकांत सस्ते , जनार्दन सस्ते ,पोपट सस्ते , विनायक चव्हाण , विश्वास चव्हाण , मुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी प्राथमिक शाळेचे भिसे सर आर्ट ऑफ लिव्हिंग फलटण तसेच सस्तेवाडी कंबळेश्वर ग्रामस्थ महिला व नागरिक उपस्थित होते
प्रास्तविक संतोष जाधव यांनी केले