पुसेसावळी:-(खटाव)-कुसुमाग्रजांना अभिवादन करत राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी गौरव दिन उत्साहात.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

कुसुमाग्रजांना अभिवादन करत राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी गौरव दिन उत्साहात.

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील
पुसेसावळी(खटाव ):- पुसेसावळी येथील राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मराठी गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी गौरव दिन हा ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या साहित्यसेवेचा आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मधुकर सावंत (भाऊ) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वैभव आणि मातृभाषेच्या जतनाची जबाबदारी यावर भाष्य करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या गौरवगीताने झाली. विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणातून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी “मराठी भाषा व विकास” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत मिळालेल्या क्रमांक विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सत्वशीला गुरव यांनी प्रभावीपणे केले. मराठी विभाग प्रमुख सौ.कविता भोसले ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होत्या. तर आभार प्रदर्शन सौ.गायत्री मुळे मॅडम यांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे शाळेत मराठी भाषेबद्दलचा सन्मान आणि अभिमान अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.




