आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-(कोकरेवाडी)-१२ तासांच्या थरारानंतर रानगवा जेरबंद; वनविभागाच्या चिकाटीला यश!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

1) फलटण:-(कोकरेवाडी)-१२ तासांच्या थरारानंतर रानगवा जेरबंद; वनविभागाच्या चिकाटीला यश!

 सातारा प्रतिनिधी – सारिका गवते

कोकरेवाडी-विडणी परिसरात सुटकेचा नि:श्वास; एकावर हल्ल्याने पसरली होती भीती
फलटण, दि. २८ : कोकरेवाडी आणि विडणी (ता. फलटण) परिसरात दहशत माजवणाऱ्या रानगव्याला तब्बल १२ तासांच्या थरारक मोहिमेनंतर वनविभागाने अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले. सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
परिसरात रानगवा शिरल्यानंतर मोठी घबराट पसरली होती. दरम्यान, राजेंद्र सदाशिव जाधव यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
माहिती मिळताच वनविभागाचे पथक आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रानगवा वारंवार ऊसाच्या दाट पिकात आणि शेत परिसरात लपून बसत असल्याने त्याला शोधणे मोठे आव्हान ठरत होते. सकाळपासून सुरू झालेली मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. अखेर जाळे आणि ट्रँक्विलायझर गनच्या साहाय्याने अत्यंत कौशल्याने त्याला जेरबंद करण्यात आले.
या संपूर्ण कारवाईदरम्यान ग्रामस्थांनी संयम राखत वनविभागाला सहकार्य केले. कोणतीही अतिरिक्त जीवितहानी न होता मोहीम यशस्वी झाल्याने वनविभागाच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, पकडलेल्या रानगव्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. तसेच, वन्यप्राणी आढळल्यास अफवांवर विश्वास न ठेवता तातडीने प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

2) कराड:-मराठी भाषा ही केवळ भाषा नसून आपली अस्मिता – विश्वासराव शिर्के.

नांदलापूर येथील सुखशांती वाचनालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
कराड दि. २८ : “मराठी भाषेला समृद्ध परंपरा लाभली आहे. डिजिटल युगात वाचन संस्कृती ही केवळ गरज नसून तो आपला मूलभूत अधिकार आहे. मराठी भाषा ही केवळ भाषा नसून आपली अस्मिता आणि ओळख आहे. तिच्या जतनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे,” असे प्रतिपादन सुखशांती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विश्वासराव शिर्के यांनी केले.
नांदलापूर (ता. कराड) येथील सुखशांती सार्वजनिक वाचनालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ तसेच ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन विश्वासराव शिर्के व प्रमुख पाहुणे संजय लावंड यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या भाषणात शिर्के पुढे म्हणाले की, वाचनालये ही समाजाची बौद्धिक शक्ती वाढवणारी केंद्रे आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आदर्श वाचक बनले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा गौरव होईल.
प्रमुख पाहुणे संजय लावंड यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांच्या कवितांमध्ये मानवता, स्वातंत्र्य आणि सामाजिक जाणीव ओतप्रोत भरलेली आहे. युवकांनी अधिकाधिक मराठी साहित्याचे वाचन करून भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अनिल शिर्के, अनन्या दोडमणी, राजाराम पाटील, प्रकाश शिर्के, मेजर सुनील सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास आनंदराव शिंदे, मनोज थोरात, बाळासाहेब शिंदे, महादेव लावंड, बलराम भाऊ, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ व वाचक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे मार्गदर्शक शेखर शिर्के यांनी केले, तर आभार सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विश्वासराव निकम यांनी मानले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button