आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-लाहोटी कन्या प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

कराड:-लाहोटी कन्या प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न.

कराड :- कराड येथील स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या विज्ञानातील मोलाच्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका हेमलता जंगम , उपमुख्याध्यापिका छाया कुंभार , पर्यवेक्षिका सुनीता अवघडे , विज्ञान विभाग प्रमुख संगीता शेवाळे तसेच सर्व विज्ञान शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर संगीत शिक्षिका अदिती फडके , अमृत गिजरे आणि विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.अनन्या भुसारी हिने केले. आपल्या मनोगतातून तिने दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्वही स्पष्ट केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध विज्ञान विषयक स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या यशामागे मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नाटिका, नृत्य, पथनाट्य आणि संवाद या विविध उपक्रमांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सिद्धी सोनुलकर हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. श्रावणी पाटील हिने केले.
अशा विविध उपक्रमांनी परिपूर्ण असा राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button