आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-नियम कागदावर विक्री टपरीवर ! वाईतील गुटखा विक्री थांबवणार कोण? प्रशासनाचे दुर्लक्ष. कारण काय?

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) वाई:-नियम कागदावर विक्री टपरीवर ! वाईतील गुटखा विक्री थांबवणार कोण? प्रशासनाचे दुर्लक्ष. कारण काय?

सातारा वाई.
महाराष्ट्र राज्यत कडक गुटखा बंदी असताना देखील वाई शहरात अनेक ठिकाणी टपऱ्यांवर राजरोसपणे विक्री केली जात आहे वाई शहरात तसेच गल्ली बोळात प्रतिबंधित गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे विशेष म्हणजे शाळा महाविद्यालये परिसरात १०० मीटरच्या आत गुटखा विक्रीस बंदी असताना देखील या नियमाला कोलदांडा दाखवून हे काम भयमुक्त पद्धतीने गुटखा विक्रीकर बिनधास्त पणे करत आहेत. अधून मधून एफ.डी.ए. व पोलीस प्रशासनाच्या लहान मोठ्या कारवाया होताना दिसतात.मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे या कारवाया नुसत्या दाखवण्या पुरत्या तर नाही ना असा प्रश्न वाईकर नागरिक उपस्थित करत आहेत. गुटखा आणि तंबाखू जन्य पदार्थांवर महाराष्ट्र राज्य सरकारने बंदी आणली आहे शिवाय यासाठी मकोका सारख्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी ही सुचित केले आहे ऐवढे कडक धोरण असताना ही वाई शहरात अनेक ठिकाणी पानटपऱ्यांवर निर्भिड पणे गल्ली बोळात गुटखा विक्री
राजरोसपणे होणे म्हणजे गुटखा डिलर आणि संबंधित प्रशासनाच्या हित संबंधांच्या असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत तसेच प्रशासनाच्या कामांबाबत अनेक नागरिक शंका उपस्थित करत आहेत. अशा या गुटखा व तंबाखू जन्य पदार्थांमुळे कर्क रोग होण्याची जास्त संभावना आहे या कर्क रोगामुळे देश भरात लांखो मृत्यू झाले आहेत व लांखो लोक या रोगात मरणयातना भोगत आहेत. अशा या बिनधास्त गुटखा विक्री मुळे शाळकरी मुले तसेच महाविद्यालयीन मुले मुली तरूण पिढी वेसनाधिन होत असल्याचे पहावयास मिळत आहे यावर संबंधित पोलिस प्रशासन या गुटखा माफियांवर तसेच राजरोसपणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का? आणि करणार तर कधी करणार. का? नुसतीच कारवाईची दिखाऊ भुभिका दाखवणार असा थेट प्रश्न वाईकर सर्व सामान्यांकडुन उपस्थित केला जात आहे तसेच अशा गुटखा माफियांवर डिलरवर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ही वाईकरांकडून होत आहे.

2) वाई:-ऐतिहासिक वाईच्या बाजारपेठेत कामगारांची ‘अवेहलना; किमान वेतनाला हरताळ! दुजा भाव आणि आर्थिक पिळवणूक.!

सातारा वाई.
साताऱ्याचे प्रवेशद्वार आणि ऐतिहासिक बाजारपेठ असलेल्या वाई शहराच्या बाजारपेठेत कामगारांची दैनिय अवस्था पहायला मिळत आहे वाईच्या बाजारपेठेत अनेक प्रकारची दुकाने वआस्थापना कार्यरत आहेत तसेच अनेक प्रकारच्या कंपनीचे वितरक कार्यरत आहेत मात्र या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनाची मोठ्या प्रमाणात अवेहलना होत असल्याचे पहावयास मिळत आहे अनेक दुकाने,आस्थापना अनेक प्रकारच्या कंपनीचे वितरक यांचेकडे काम करणाऱ्या कामगारांनाचा काम कार्य काळ वीस ते चाळीस वर्षांपर्यंतचा झालेला असल्याचे समजते मात्र या कामगारांना अद्याप ही शासन निर्णयाप्रमाणे वेतन मिळत नसल्याचे माहिती समोर येत आहे. ना किमान वेतन ना कामगार सोईसुविधा ना वेळेचे बंधन दहा ते बारा तास काम करून सुद्धा किमान वेतनाचा दर तर लांबच मात्र तुटपुंजे वेतन देवून कामागारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक,मानसिक व शारीरिक फसवणूक होत असल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे काही ठिकाणी कामगाराना मोठ्या प्रमाणावर आर्थिक, मानसिक तसेच शारीरिक दुजा भावाची वागणूक मिळत असल्याचेही पहायला मिळत आहे या कामगारांचे भवितव्य काय? कामगारांच्या घामाचा कष्टाचा पैसा लुबाडून खाण्याचे काम वाईच्या बाजारपेठेत राजरोसपणे सुरू आहे. कामगारांच्या आर्थिक, मानसिक शारीरिक बाबींचा फायदा घेऊन दबाव तंत्राचा वापर करून कामगारांची अवेहलना केली जात आहे कामगारांची मोठ्याप्रमाणात फसवणूक झाल्याचे तसेच होत असल्याचे दिसून येत आहे. कामगारांच्या घामाचा पैसा लाटणाऱ्यांवर वाई बाजार पेठेतील दुकाने , आस्थापना तसेच अनेक कंपन्यांचे वितरक (डिस्ट्रीब्यूटर) यांचेवर सातारा जिल्हा कामगार कार्यालयाकडून तपास यंत्रणा राबवून कामगारांनांची फसवणूक अवलेहना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कामगारांना कामगार कायद्यानुसार असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देतील का? याची चर्चा ही कामगारांकडून सातत्याने होत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button