आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सिंधुदुर्ग:-“सिंधुदुर्गच्या विकासाला गती देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश”

पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) “सिंधुदुर्गच्या विकासाला गती देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश”

 सिंधुदुर्ग प्रतिनिधी शैलेश मेस्त्री

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया तातडीने
राबविण्याबाबत मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली.
या बैठकीस वित्त विभागाचे अप्पर सचिव तानाजी पवार, कृषी विभागाचे चंदन शिवे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव सोमनाथ बागुल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे दीपक केंद्रे, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव श्री. ठाकूर, जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, जलसंधारण विभागाचे सहसचिव संदीप जाधव यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा व राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा जिल्हा आहे. तसेच राज्यातील पहिला एआय युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळख मिळाली असून, नीती आयोगाने सिंधुदुर्गच्या एआय मॉडेलची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्गमधील विविध आस्थापनांवरील वरिष्ठ व आवश्यक पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी या त संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

2) कणकवली:-शिवजयंतीनिमित्त कलमठमध्ये १९ रोजी वक्तृत्व स्पर्धा.

| कणकवली शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कलमठ यांच्यावतीने गुरुवार १९ रोजी कलमठ बाजारपेठ येथील श्री देव काशिकलेश्वर मांड येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांत होईल.
पहिली ते चौथी गटासाठी माझे आवडते राजे- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील एक सुंदर प्रसंग हे विषय असून या गटासाठी अनुक्रमे ७०१ रु., ५०१ रु., ३०१ रु. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. तर पाचवी ते आठवी गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श आणि प्रेरणादायी जीवनकार्य

छत्रपती शिवाजी महाराजांचे धाडसी निर्णय किंवा प्रसंग, स्वराज्याची पायाभरणी : शिवाजी महाराजांचे शेती आणि महसूल धोरण हे विषय असून यागटासाठी १००१
व्हावे. रु., ७०१ रु., ५०१ रु. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी अधिक माहितीसाठी सुशांत राऊळ, नितीन उर्फ आबा मेस्त्री, नितीन पेडणेकर, प्रकाश कांबळे, धीरज मेस्त्री, अनुप वारंग, सिकंदर मेस्त्री, नितेश भोगले यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. शिवजयंती समिती गेल्या काही वर्षांपासून शिवजयंती साजरी करत आहे.

3) कणकवली:-शिवजयंती उत्सव समिती, कलमठ आयोजित भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.

कणकवली दि.१८ फेब्रुवारी (प्रतिनिधी) शिवजयंती
जन्मोत्सवानिमित्त शिवजयंती उत्सव समिती, कलमठ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ४९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. स्वप्निल राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच अनंत हजारे, तनोज कळसूलकर, दिनेश लाड, सुशांत (बाबू) राऊळ, महेश लाड, विलास गुडेकर, किरण हुन्नरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य नितीन पेडणेकर, नितीन (आबा) मेस्त्री, धीरज मेस्त्री, नितेश भोगले, अनुप वारंग, प्रदीप सावंत, सिकंदर मेस्त्री, सागर गावडे, सुंदर कोरगावकर, निश्चय हुन्नरे, प्रसाद मटकर, बाळू मेस्त्री, बाबू कोरगावकर, संदीप कांबळी, संदेश कदम, राहुल कदम व श्रीकांत बुचडे, पप्पू कोरगावकर आदी उपस्थित होते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संदेशाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठी मदत होणार असून शिवजयंती उत्सवाला समाजहिताचा सुंदर संदेश लाभला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button