माळेवाडी:-डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित ‘साहित्यिक फेरफटका’ म्हणजे साहित्य चळवळीचे मुक्तचिंतन!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माळेवाडी:-डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित ‘साहित्यिक फेरफटका’ म्हणजे साहित्य चळवळीचे मुक्तचिंतन!

RPS स्टार न्यूज प्रतिनिधी – संजय पगारे
माळेवाडी / श्रीरामपूर( RPS स्टार न्यूज प्रतिनिधी) साहित्य म्हणजे समाजहितकारक शब्दनिर्मिती होय. अशा साहित्य चळवळीत १९७७ – ७८ पासून कार्यरत असणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित ‘साहित्यिक फेरफटका’ हे पुस्तक म्हणजे साहित्य चळवळीचे तत्कालिन प्रतिबिंब असून ते एक मुक्तचिंतन असल्याचे मत श्रीरामपूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे माजी कार्याध्यक्ष,प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रमात डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या *’साहित्यिक फेरफटका’* या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा सन्मानसोहळा आणि अभिजात मराठी भाषा मुक्तचिंतन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शेळके बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी तहसिलदार व शिर्डी विमानतळाचे तत्कालिन अधिकारी गुलाबराव पादीर होते. वृद्धाश्रमातील श्रीविठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील मूर्तींचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी माजी प्राचार्य टी.ई. शेळके, पत्रकार बाबासाहेब चेडे यांच्या सेवाकार्याचा परिचय सांगून पुस्तकनिर्मितीची कथा विशद केली. पुष्पा प्रकाशनचे प्रकाशक सुखदेव सुकळे यांनी पुस्तकाचा परिचय करुन दिला, प्राचार्य शेळके, बाबासाहेब चेडे यांचा सुखदेव सुकळे यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सत्कार केले. प्राचार्य शेळके यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, माऊली वृद्धाश्रम आणि जानकी अनाथ विद्यार्थी वसतिगृह म्हणजे श्रीरामपूरमधील एक लोकसेवा भक्तीचे तीर्थस्थळ आहे. या तीर्थस्थळांचे प्रमुख सुभाष वाघुंडे आणि कल्पनाताई वाघुंडे यांनी आपले सर्वस्व अर्पण करून हे तीर्थस्थळ उभे केले आहे.अशा सेवाभावी तीर्थस्थळी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म्हणजे एक अमृतपर्वणी आहे. निराधार वृद्ध,विद्यार्थी यांना एक जीवन संजीवनी देणारा हा मराठी भाषेला हा सन्मान आहे. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी उंबरगावचे उद्योगपती आणि देणगीदार हरिशेठ भोसले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील, प्रा. शिवाजीराव बारगळ,पत्रकार बाबासाहेब चेडे, पत्रकार, कवी, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, कवी, गीतकार बाबासाहेब पवार, आरोग्यमित्र भीमराज बागूल, कुंडलिक खैरनार आदिंनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात गुलाबराव पादीर म्हणाले, प्राचार्य शेळके यांचे जीवन म्हणजे एका ज्ञानर्षीची तपस्वी वाटचाल आहे.८४ वर्षाच्या वाटचालीचे त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन इत्यादी कार्य समाजप्रेरक आहे, अशा तपस्वी, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते *’साहित्यिक फेरफटका’* पुस्तकाचे प्रकाशन होणे ही अभिनंदनीय घटना आहे.डॉ.बाबुराव उपाध्ये यांचे लेखन म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी केलेला एक आत्मसंवाद आहे,एका प्रामाणिक शब्दप्रभूची ती निर्मिती आहे. असे सांगून प्राचार्य शेळके,पत्रकार बाबासाहेब चेडे, डॉ. बाबुराव उपाध्ये, सुभाष वाघुंडे, कल्पनाताई वाघुंडे यांचे सत्कार केले.प्राचार्य शेळके यांनी माऊली वृद्धाश्रम,डॉ. कैलास पवार यांच्या भूमी फौंऊंडेशन सेवाकार्यास धनादेश प्रदान केले. दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर, संतोष भालेराव वृद्धाश्रमातील माताभगिनी, विद्यार्थी यांनी नियोजन केले. कविसंमेलन, अभिजात मराठी भाषा मुक्तचिंतन सादर झाले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर . माऊली वृंद्धाश्रमाच्या सचिव कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.




