सातारा जि.प.सत्तेसाठी राष्ट्रवादी सेनेवर सदस्य आणि मतदारांचा दबाव…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सातारा जि.प.सत्तेसाठी राष्ट्रवादी सेनेवर सदस्य आणि मतदारांचा दबाव…

सातारा प्रतिनिधी :- अजित जगताप
सातारा दि: ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजणाऱ्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदारांनी निर्णायक कौल दिला आहे. यामध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा संदेश मतदारांनी दिला आहे. या मतदारांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी व सेनेचे सदस्य निवडून आले आहेत. कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, जावळी, कराड, पाटण, फलटण तालुक्यात थेट संघर्ष झाला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य व मतदारांचा दबाव झुगारून निर्णय घेतल्यास सेना राष्ट्रवादीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल .असे चित्र दिसत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजप चांगलेच बॅकफूटवर आली आहे . तरीही मोठ्या आत्मविश्वासाने राष्ट्रवादी व सेनेला डिवचण्यासाठी भाजप नेते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. याचा पुनर्विचार केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे सदस्य सहलीला गेले आहेत. हा सुद्धा राजकारणाचा भाग आहे.
हे एक प्रकारे भाजपने सेना राष्ट्रवादीला उघडपणे आव्हान ठरले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगून राष्ट्रवादीचे सदस्य मतदारांना वारेवर सोडून थेट प्रचलित विचारानुसार सहलीला गेले आहेत. जिथे अभ्यास दौऱ्यावर कुठलाही अभ्यास न करता काही महाभाग मौज मजा मारून येतात. त्या ठिकाणी पती-पत्नीस सहलीतून कोणतेही विचार मंथन होणार नाही. उलट या सहलीतून अनेकांचा थकवा नाहीसा होणार आहे. ही व्यक्तिगत बाब असली तरी सत्तेचे समीकरण जुळवताना भाजपला इशारा काफी आहे. असे समजण्यात येत आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने १५ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने २० जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुती मधील बेबनाव व गैरविश्वासाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, यांनी सत्तेत राहूनही भाजप विरोधात आपापल्या पक्षाची धुरा, समर्थपणे सांभाळली आहे. विजय उमेदवारांच्या बॅनरबाजीतूनही तसेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षातच बसावे लागेल असे चित्र दिसत आहे.
जर विरोधी पक्षात बसायचे नसेल तर भाजपला काही पावले मागे घ्यावी लागणार आहेत. ही राजकीय पीछेहाट ठरणार आहे. अशी ही चर्चा सुरू झालेली आहे. आता ही चर्चा नेमकी कोण करते? हे कधीच उघड झाले नाही. परंतु काही माध्यमातून दररोज एक फॉर्मुला जन्माला येत असून त्याची दुसऱ्या दिवशी भ्रूणहत्या ही होत आहे. त्यामुळे नेमका काय घडेल? सातारा जिल्हा परिषदेच्या पदाच्या वाटपानंतर स्पष्ट होणार आहे हे मात्र खरे आहे.




