महाबळेश्वर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! नागरिकांना गहाळ झालेले १४ मोबाईल परत; ऑनलाइन फ्रॉडमधील ₹२.२५ लाखही दिले मिळवून!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! नागरिकांना गहाळ झालेले १४ मोबाईल परत; ऑनलाइन फ्रॉडमधील ₹२.२५ लाखही दिले मिळवून!
नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद! पोलिसांच्या ‘चिकाटी’ मोहिमेला मोठे यश.
महाबळेश्वर | प्रतिनिधी (RPS STAR NEWS)
महाबळेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देण्यात महाबळेश्वर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी नागरिकांचे एकूण ३ लाख २२ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल शोधून हस्तांतरित केले आहेत. तसेच ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तक्रारदारांचे एकूण २ लाख २५ हजार रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढत असल्याने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी नागरिकांना गहाळ मोबाईल शोधण्यासाठी मार्गदर्शन व सूचना दिल्या.
त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी CEIR पोर्टल तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये वापरात असलेल्या गहाळ मोबाईलचा शोध घेतला. नियमित संपर्क व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून एकूण ३ लाख २२ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल हस्तगत करून ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.
याचबरोबर ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये NCRP पोर्टलवर प्राप्त तक्रारींचा पाठपुरावा करून एकूण २ लाख २५ हजार रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले. अशाप्रकारे पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे नागरिकांचे एकूण ५ लाख ४७ हजार रुपयांचे मोबाईल व पैसे परत मिळाले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत सपोनि महाराष्ट्र परजणे, मपोउनि रुपाली काळे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव भिलारे, पोलीस कॉन्स्टेबल शंकर गलांडे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाळू भगारे यांनी सहभाग घेतला.




