मायणी येथे मुनी महाराज मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी येथे मुनी महाराज मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!.

रुद्राभिषेक,शिवभजन, महा मंगल आरतीसह शिवकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन.
मायणी | प्रतिनिधी
मायणी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री गुरु औंधकर महाराज मठ, शाखा मायणी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ जुलै रोजी होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, पंचक्रोशीतील शिष्यगण आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
गुरुपौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त मठातील मुनी महाराज यांच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक, त्यानंतर शिवभजन, महा मंगल आरती आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिवभजनासोबत शिवभक्त परायण परशुराम डोंबे यांचे शिवकीर्तन संपन्न होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमातील पूजन व इतर विधी जोगेंद्र स्वामी आणि योगेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मायणीसह विटा, माऊली, येतगाव तसेच पंचक्रोशीतील शिष्यगण आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घेणार आहेत.
गुरुपौर्णिमा हा गुरू-शिष्य परंपरेचा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी गुरूंचे स्मरण, पूजन आणि त्यांच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्यासाठी भाविक मोठ्या भक्तिभावाने एकत्र येतात. त्याच भक्तिभावाने मायणी येथील श्री गुरु औंधकर महाराज मठ शाखेत आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यात सर्व शिष्य व भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि गुरुकृपेस पात्र व्हावे, असे आवाहन औंकर मठातील शार्दुल स्वामी निंबर्गीकर यांनी केले आहे.




