आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाटण:-‘भाऊ’ंच्या आठवणींनी मान्याचीवाडी द्रवली; स्व. उत्तमराव तुकाराम माने यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाला भावनिक अभिवादन.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

‘भाऊ’ंच्या आठवणींनी मान्याचीवाडी द्रवली; स्व. उत्तमराव तुकाराम माने यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाला भावनिक अभिवादन.


लोकसेवेच्या जाज्वल्य वारशाला सलाम; कार्याच्या ठशांनी आजही समाजमन उजळले
पाटण, दि. १४ : जनतेसाठी आयुष्य वेचणारे, शिक्षण-राजकारण-क्रीडा-सहकार या सर्व क्षेत्रांत ठसा उमटवणारे लोकनेते स्व. उत्तमराव तुकाराम माने (भाऊ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वा. मान्याचीवाडी येथे भावनिक वातावरणात अभिवादनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतींनी आजही गावागावांत प्रेरणेची ज्योत चेतवली असून, समाजमन कृतज्ञतेने नतमस्तक झाले आहे.
सामाजिक बांधिलकी, निष्ठावंत राजकारण आणि शिक्षणसेवा यांचा संगम साधत भाऊंनी जनतेचा विश्वास कमावला. सातारा जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवले; तर क्रांती स्मृती कनिष्ठ अध्यापक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणून असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. लोकनेते विलासकाका उंडाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज बुलंद ठेवला.
क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य म्हणून खेळाडूंना बळ दिले; तर कोयना दूध संघचे संचालक म्हणून सहकार चळवळ मजबूत केली. त्यांच्या कार्याची व्याप्ती इतकी व्यापक की, आजही त्यांच्या नावाने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर हृदयात अभिमान दाटून येतो.
भाऊंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आयोजित या पुण्यस्मरण सोहळ्यास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमती शशिकला उत्तमराव माने व पवनजित उत्तमराव माने यांनी केले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button