पुणे वारजेत पोलिस कारवाई; 15 बुलेट फटाका सायलेन्सरवर हातोडा.
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुणे वारजेत पोलिस कारवाई; 15 बुलेट फटाका सायलेन्सरवर हातोडा.

पुणे : वारजे परिसरात वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत बुलेट दुचाकींवर लावलेले तब्बल 15 फटाका सायलेन्सर जप्त केले आहेत. ही कारवाई वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या वाहनांवर करण्यात आली.
बुलेट दुचाकींच्या फटाका सायलेन्सरमुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर वारजे परिसरात विशेष मोहीम राबवत पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी केली. तपासादरम्यान नियमबाह्य सायलेन्सर आढळून आल्याने संबंधित वाहनांवर कारवाई करत सायलेन्सर जप्त करण्यात आले.
पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, भविष्यात अशा प्रकारचे फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




