खटाव:-मायणी गटात ऍड सुरज पाटील ठरले जॉइंट किलर.
जेष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मायणी गटात ऍड सुरज पाटील ठरले जॉइंट किलर.

मायणी प्रतिनिधी—मायणी गटात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक चुरशीची पाहायला मिळाली विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या आश्चर्यकारक पराभव करत युवा नेते ऍड सुरज पाटील हे जॉईंट क्लिअर ठरले या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते कारण सुरेंद्र गुदगे हे मुरब्बी राजकारणी आणि चार टर्म जिल्हा परिषद सदस्यत्व त्यांच्या घरात होते त्या तोडीचा उमेदवार मिळणे हे मुश्किल असताना दिलीपराव येळगावकर यांनी उगवते नेतृत्व सुरज पाटील यांच्यावर धुरा सोपवून डॉक्टर येळगावकरांनी डाव खेळला स्वतः दिलीपराव येळगावकर एडवोकेट सुरज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा परिषद गट अक्षरशः पिंजून काढला त्याचबरोबर त्यांनी नव्या जुन्या कार्यकर्त्याचा मेळ घालून विजयश्री खेचून आणली त्यातच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष लक्ष या गटावर होते त्यांचे कार्यकर्तेही खांद्याला खांदा लावून फिरत होते सर्वच लोकांचे टार्गेट असणारे सुरेंद्र गुदगे यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत हद्दपार करायचे असा चंग त्यांनी बांधला होता त्यामुळे चार टर्म जिल्हा परिषद सदस्यत्व आपल्या घरात असणाऱ्या सुरेंद्र गुदगे यांना पराभवाची चांगलीच चव चाखावी लागली कलेढोण व चितळी गणात भाजपने मुसंडी मारत दोन्ही गणातील उमेदवार एक हजाराच्या वर फरकाने निवडून आणले त्यामुळे मायणीत बऱ्याच वर्षानंतर भाजपाचा वर चष्मा दिसून आला या निवडणुकीत पुन्हा एकदा गुदगे येळगावकर हा संघर्ष दिसून आला पण यावेळेस येळगावकर गापिल राहिले नाहीत त्यांनी सर्व आयुधांचा उपयोग करून विजयश्री पदरात पडली त्यांनी या पद्धतीने आपला पुढचा वारसदार पुढे आणला आता इथून पुढे नाही गटात जयकुमार गोरे, डॉक्टर दिलीपराव येळगावकर व एडवोकेट सुरज पाटी हे विकास कोणत्या पद्धतीने करतात हे पाहणे गरजेचे आहे.




