पारनेर:-सुपा येथे शिवबाबांचे ९० वे अवतरण सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सुपा येथे शिवबाबांचे ९० वे अवतरण सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न.

सुपा,पारनेर(राजकूमार इकडे)
“राजयोगाच्या नियमित अभ्यासाने मानवी जीवनात सकारात्मक बदल घडतात. यामुळे केवळ वैयक्तिक जीवनच नाही, तर जगाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो आणि जीवनात शांती व आनंद निर्माण होतो,” असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी साधना दिदी यांनी केले.
सुपा येथील ब्रह्मकुमारी गीता पाठशाळेत आयोजित महाशिवरात्री उत्सव आणि शिवबाबाचे ९० वे अवतरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. हा सोहळा अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पारनेर सेंटरच्या संचालिका साधना दिदी यांच्या हस्ते ‘मुरली’ कथनाने झाली. यानंतर, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले आणि त्यानंतर ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी वातावरणात शिवभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.गीतेंच्या वचनानुसार जेव्हा जेव्हा मनुष्य धर्म भ्रष्ट व कर्म भ्रष्ट बनतो अशा वेळी स्वयं परम पिता शिव निराकार या भारत भूमीवर अवतरित होतात,या समयाचे यादगार म्हणूनच आपण सर्व दरवर्षी महाशिवरात्र साजरी करतो म्हणजे शिव भगवान या भारत भूमीवर अवतरित होऊन आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत
परंतु आपण महाशिवरात्री दिवशी उपवास का करतो?पांढरी साडीच का घालतात?कडू धोतर्याचे फुलच का वाहतात?त्रिकुंड का ओढतात? पिंडीवर अभिषेक का करतात? अखंड नारळच का वाहिला जातो? तीन पानांचे बेलपत्रच का वाहिले जाते? शिव निराकार भारत भूमीवर कधी अवतरित होतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकायला जरुर एकदा ब्रह्माकुमारी विद्यालयाला भेट द्या, प्रवेश विनामूल्य आहे….
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले. उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्यामुळे सुपा परिसरात आध्यात्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी सुपा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर मैड, देवराम भाई ढोले, प्रतिमा माताजी, सुमन ढोले, दिलीप थोरे, लक्ष्मण गवळी, मीना मेमाणे, रामदास भाई, राम भाई,पार्वती माता, सुषमा माता, कदम भाई, मोकाते भाई यांच्यासह परिसरातील अनेक ब्रह्मकुमारी अनुयायी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




