जुन्नर:-श्री शिव छत्रपती महाविद्यालयात ‘अर्थसंकल्प 2026 परीपेक्ष्य’ याविषयी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

दि. 9 फेब्रुवारी २०२६
जुन्नर:-श्री शिव छत्रपती महाविद्यालयात ‘अर्थसंकल्प 2026 परीपेक्ष्य’ याविषयी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

[अर्थसंकल्पावरील पोस्टर प्रदर्शन व नाविण्यपूर्ण रांगोळी स्पर्धेचे आयोजन]
श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग व आयक्यूएसी अंतर्गत ‘अर्थसंकल्प 2026 परिपेक्ष’ याविषयीची कार्यशाळा सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अँड. संजय शिवाजीराव काळे साहेब व अध्यक्ष प्रतिनिधी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी दिली.
या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे, मार्गदर्शन आणि कार्यशाळेचे उद्घाटन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका, सहा. प्राध्यापिका व रिता इंडिया फाउंडेशनच्या संचालिका, प्रा. डॉ.रिता मदनलाल शेटीया यांनी केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे होते. या कार्यशाळेच्या प्रसंगी पोस्टर प्रदर्शन व अर्थसंकल्प नाविन्यपूर्ण रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजगुरुनगर येथील रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे डॉ.सचिन पवार, चाकण येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. उमेश भोकसे यांनी काम पाहिले.
विकसित भारतासाठी गतिमान, सर्वसमावेशक व रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पाच्या तरतुदीची चर्चा करताना डॉ. रिता शेटीया यांनी पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो आणि नवनवीन योजनांची घोषणा केली जाते, पण त्याची अंमलबजावणी आणि जागृती ही तळागाळापर्यंत पोहचायला हवी. तेव्हाच प्रत्येक घटक या योजनांचा लाभ घेऊ शकेल आणि सर्वसमावेशक विकास साधता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मार्मिक उत्तरे दिली.
अध्यक्षीय मनोगनातून प्राचार्य डॉ.वाघमारे यांनी भारत हा शेतीप्रधान देश असून त्याचे त्यावरील अवलंबित्व अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे शेतीक्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असायला हवा असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्त्या एचसी. डॉ. सवीता शेटीया, अर्थशास्त्र विषयातील अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. गोरक्षनाथ सानप, संगमनेर येथील प्रो.डॉ. प्रताप फलफले, नारायणगाव महाविद्यालयातील डॉ. श्रीकांत फुलसुंदर, ओतूर महाविद्यालयाचे डॉ. रमेश काशिदे, वाणिज्य विभाग प्रमुख सतीश जाधव, पर्यवेक्षक श्रीमंते आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरित करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सचिन कसबे, पाहुण्यांचा परिचय प्रा. एम.आर.शेलार, सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एच.काळे तर कार्यक्रमाचे आभार प्रा. आर. ए . मोरे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागातील प्रा. पी. बी. सुकाळे, मानसशास्त्र विभागातील प्रा. जावेद शेख, श्री. मितेश गाडेकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




