कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पारनेर:-(सुपा)-औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पारनेर | सुपा ( राजकुमार इकडे )

पारनेर:-(सुपा)-औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची (Supa MIDC) वेगाने वाढ होत असताना काही घटक उद्योजकांना त्रास देण्याच े प्रकार करत असल्याची माहिती मिळाली आहे. हे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढले जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिला. मात्र, ठोकून काढणे म्हणज े कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलेअहिल्यानगर-पुण े महामार्गावरील (Ahilyanagar Pune Highway) सुपा (ता. पारनेर) औद्योगिक क्षेत्रातील तौरल इंडिया (Taural India) या प्रकल्पाच े उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेच े सभापती राम शिंदे, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते, महंत नामदेव शास्त्री, महंत शिवाजी महाराज, तौरल इंडियाच े प्रमुख भरत गिते उपस्थित होतेमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागरिकांना उद्योगांकडून काही अडचणी असतील तर त्यांनी अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करावी. मात्र, उद्योगांना दिला जाणारा बेकायदेशीर त्रास खपवून घेतला जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग येत असताना येथ े काही वाईट ‘उद्योग’ ही निर्माण होत

असल्याची माहिती आहे. अशा घटनांकडे कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीन े अत्यंत गांभीर्यान े पाहिले जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’,

उत्पादन खर्चातील सुलभता आण ि मजबूत कायदा- सुव्यवस्थेमुळ े महाराष्ट्रात उद्योगवाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील अगदी लहान घटनाही गंभीर मानून त्यावर तातडीन े कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.महाराष्ट्रात उद्योगवाढ होत असताना पर्यावरणाच े संरक्षणही तितकेच महत्त्वाच े आहे. उद्योग पर्यावरणपूरक असले पाहिजेत. उद्योगवाढ आण ि पर्यावरण यांचा समतोल साधण े आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी उद्योगवाढ प्रामुख्यान े मुंबई-पुण े पट्ट्यात मर्यादित होती. आता उद्योगांच े विकेंद्रीकरण सुरू करण्यात आले असून राज्याच्या प्रत्येक भागात उद्योग पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच े स्वप्न साकार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून उत्पादन क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेउद्योगमंत्री उदय सामंत (Industry Minister Uday Samant) म्हणाले, दावोस गुंतवणूक परिषदेनंतर सरकार काय करते? याच े उत्तर सुपा औद्योगिक क्षेत्रातील तौरल इंडिया या एका वर्षातच उत्पादन सुरू झालेल्या प्रकल्पान े दिले आहे. विशेष म्हणज े हा प्रकल्प एका मराठी उद्योजकान े उभारला आहे. तौरल इंडियाच े मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांनी प्रकल्पाची माहिती देताना 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 1,200 जणांना थेट रोजगार उपलब्ध झाल्याच े सांगितले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button