साताऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित चिंतेत….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

साताऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित चिंतेत….

सातारा दि: महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर निष्ठा असणाऱ्या व सत्तेत हिस्सा मागणारा रिपब्लिकन सेना एकमेव पक्ष आहे. या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये तीन दमदार उमेदवार उभे केले आहेत. त्यांना उदंड प्रतिसाद लाभल्याने रिपब्लिकन सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीही प्रचाराकांचे कौतुक केले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय वाटाघाटी मध्ये युती व आघाडी मध्ये सहभागी होण्याची परंपरा आहे. यामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांना वाटा मिळतो. परंतु, प्रत्येक वेळी रिपब्लिकन पक्षाच्या सर्वच घटकाचा घाटा होतो. हे बदल घडवण्यासाठी रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन सेनेने आगेकूच केली आहे.
फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता व मतदार यांचे प्रश्न मांडण्यासाठी रिपब्लिकन सेना आहे. असं अधोरेखित झालेले आहे.
सर्व रिपब्लिकन पक्षातील स्वाभिमानी अध्यक्ष घटक व पक्ष हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारावर चालणारे आहेत . ते चळवळीतील निस्वार्थी व प्रामाणिक सहकारी बंधू आहेत. त्यांचेही योगदान आमच्यासाठी हत्तीचे बळ आहे.
या भावनेतूनच रिपब्लिकन सेनेने सातारा जिल्ह्यातील लिंब जिल्हा परिषद गटामध्ये
विशाल भोसले, खेड जिल्हा परिषद गटामध्ये स्वप्निल हराळ आणि सातारा रोड पंचायत समिती गणात नितीन रोकडे असे तीन चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. रिपब्लिकन सेना व शिवसेना एकनाथ शिंदे गट यांची युती असली तरी आम्ही राजकीय निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहोत. हे दाखवून देण्यासाठी तीन ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. या उमेदवारांचे माता भगिनी स्वागत करत आहेत . रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते अशोक भिसे,महिला जिल्हाध्यक्ष सौ पद्मा दत्ता सुतार, उपाध्यक्ष सौ. सुरेखा धोत्रे,महिला सचिव सौ. ज्योती गंगावणे आणि युवा नेते रमेश गायकवाड, दीपक गाडे, गौतम रणदिवे, बबन कांबळे, जयश्री शिंदे, सुलेमान शेख व जिल्हा कार्यकारणी परिश्रम घेत आहेत.
क्रांतीसुर्य महात्मा फुले- छत्रपती शाहू महाराज -डॉ बाबासाहेब आंबेडकर- वीर लहुजी वस्ताद- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व युगपुरुषांच्या विचाराची बांधिलकी जपणाऱ्या रिपब्लिकन सेनेच्या अधिकृत तिन्ही उमेदवारांनी आपलं अस्तित्व निर्माण केले आहे. या उमेदवारांचे चळवळीतील योगदान पाहून त्यांना ग्रामस्थ व मतदार सक्रिय सहकार्य करत आहेत. प्रचारा निमित्त मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद म्हणजे खऱ्या अर्थाने गोरगरिबाच्या घरातील सिलेंडरवर बनवलेला आणि कपबशीतील कडक व गरम चहा आम्हाला सर्व अधिक प्रिय आहे. याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. हेच आमच्यासाठी विजयाची नांदी आहे. असा विश्वास उमेदवारांनाही आहे.
रिपब्लिकन सेना हे कोणत्याही पक्षाचे स्पर्धक नसून ते मतदारांचे सेवक आहेत. वैचारिक भूमिका घेऊन लढणाऱ्या पक्षासाठी जागरूक मतदार सुद्धा अनुकूल वातावरण तयार करत आहेत. नवलाईची गोष्ट म्हणजे सातारा तालुक्यातील खेड जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांना भेटी दिलेले आहेत. कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये कोणतीही अपेक्षा रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता व मतदार ठेवत नाहीत .त्यामुळे वैचारिक देवाण-घेवाण होत असल्याने खऱ्या अर्थाने सक्षम उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील. असा विश्वास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे स्वतः पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता खेड मतदार संघात त्यांच्या प्रचार सभेचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजता कोरेगाव तालुक्यातील भीम नगर या ठिकाणीही प्रचार सभा होणार आहे. रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांचे चिन्ह हे सिलेंडर व कप बशी आहे. हे सर्वसामान्यांचेच प्रतीक बनले आहे.




