ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिवभक्त ओमकर अंकुश जाधव यांच्या कार्याचे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार. मकरंद आबा पाटील यांनी केले कौतुक.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शिवभक्त ओमकर अंकुश जाधव यांच्या कार्याचे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार. मकरंद आबा पाटील यांनी केले कौतुक.

राज्य मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठमोळा पोवाडा व शाहिरी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपतींचा इतिहास जनसामान्य लोकांमध्ये पोहचविण्यासाठी ओमकार अंकुश जाधव व प्रथमेश भास्कर पुंडे यांची किल्ले प्रतापगड दर्शन मोहिम उत्साहात संपन्न. जयघोषाने प्रतापगड दुमदुमला. १५०+ पेक्षा जास्त शिवभक्तांनी सर केला प्रतापगड किल्ला. नवी मुंबई येथील लहान मूल, महिला, पुरुष यांनी घेतले प्रतापगडाचे दर्शन. आमच्या राजाचे पराक्रम, आयुष्य, वीरांचे बलिदान याच गडकिल्ल्यांनी बघितले आहेत. गडकिल्ले हेच खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक. माझे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानामुळे आहे. छत्रपती शिवाजी
महाराज हे सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते होते. शिवाजी महाराजांचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्म परायणतेचे होते. राज्यकर्ते म्हणून ते सर्वश्रेष्ठ तर होतेच ; पण त्याचबरोबर ते व्यक्ती म्हणून म्हणून सुद्धा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठच आहेत. शिवरायांच्या ठायी शौर्य, पराक्रम, युक्तिमत्ता, साहस, स्वाभिमान, उद्यमशीलता, निःपक्षपातीपणा, कुशलता, विवेकशीलता, गुणग्राहकता, निर्णयक्षम, कल्पकता असे विविध गुण, जीवनमूल्ये आणि जीवन कौशल्ये होती. चारित्र्याची उत्तम जडणघडण होण्यासाठी मानवाला या महत्त्वपूर्ण जीवनकौशल्यांची आवश्यकता आहे.स्वराज्यावर अफजलखानाच्या रूपाने मोठे संकट आले तेव्हा जिजामाता म्हणतात, “शिवबा या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर पण स्वाभिमानाने लढा.” आज या प्रकाराची पिढी आणि आई वडील मुलांना या राष्ट्राच्या कल्याणासाठी, राष्ट्र रक्षणासाठी समाजासाठी तयार करतील तरच भविष्य असेल असे मला वाटते.

आणि स्वराज्यातील गडकिल्ले हे पराक्रमाची, संघर्षाची प्रतिके ऊर्जास्रोत आहेत. युनेस्कोच्या यादीतील किल्ल्यांच्या भेटीतील 4 मोहिमेतील किल्ले प्रतापगड आहे. महाराजांचे विचार जनसामान्यांत रुजावे यातून राष्ट्रप्रथम पिढी उभी रहावी हेच प्रमुख उदिष्ट. मराठी शाहीर वैभव घरत आणि सायली भोसले यांचा मराठमोळा पोवाडा व शाहिरी गीतांचा कार्यक्रम वाई याठिकाणी आयोजित केला होता.
तसेच श्री. उदय पोळ यांनी किल्ले प्रतापगड, ऐतिहासिक वास्तू मंदिर, घाट बद्दल दोन दिवस संगती राहून माहिती दिली.किल्ले प्रतापगड मोहिमेतील लहान मुल, महिला पुरुष यांचा उत्साह बघून आम्हाला अजून बळ मिळालं. या किल्ल्यावर सर्वांनी तहान, भुकेला प्राधान्य न देता फक्त आणि फक्त किल्ले दर्शनासाठी महत्व देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति असलेली श्रद्धा प्रेम याला प्राधान्य देऊन या मोहिमेचे महत्व पटवून दिले.तसेचयावर्षीचा लहान शिवभक्त म्हणून कु. माही अगरवाल व महिला शिवभक्त म्हणून मनिषा पाटिल तर पुरुष शिवभक्त म्हणून पॅडी पाटील यांची निवड झाली. मोहिम यशस्वी झाली यासाठी ओमकार अंकुश जाधव आणि सर्व सहकाऱ्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button