ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नवी मुंबई:-जावळी तालुक्यात अजून सुद्धा जे दूर आहेत त्यांनी निर्णय घ्यावा मंत्री शिवेंद्रसिहराजे यांचे आवाहन.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जावळी तालुक्यात अजून सुद्धा जे दूर आहेत त्यांनी निर्णय घ्यावा मंत्री शिवेंद्रसिहराजे यांचे आवाहन.

नवी मुंबई दि: नवी मुंबई येथील शेतकरी समाज भवन येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमांमध्ये राजकारण बाजूला ठेवून जावळी तालुक्यात अजून सुद्धा जे दूर आहेत त्यांनी निर्णय घ्यावा असे जाहीर आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या वक्तव्यामुळे जावळीतील राजकीय घडी पुन्हा व्यवस्थित बसवून विकासाच्या दृष्टीने दमदार पावले टाकली असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
जावळीचे माजी आमदार सदाशिव सकपाळ, नरेंद्र पाटील यांच्या भाजप प्रवेशा निमित्त झालेल्या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक, वसंतराव मानकुमरे , ज्ञानेश्वर रांजणे,,सुरेश गायकवाड, संदीप परामणे, अँड . शिवाजीराव मर्ढेकर, जयदीप शिंदे, कविता धनावडे, अरुणा शिर्के, मच्छिंद्र मुळीक, दत्ता गावडे, अंकुश शिवणकर, शरद पवार, विजय शेलार, अविनाश करंजकर, समाधान पोफळे, आनंदराव सकपाळ, गणेश जगताप, रवि परामणे, राम शेलार, मोहन कासुर्डे,के के शेलार, मुरलीधर शिंदे, संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले.
प्रारंभी जावळी तालुक्यात विविध गावातून आलेल्या सरपंच व नेत्यांच्या उपस्थितीत माजी आमदार सदाशिव सकपाळ यांचा नागरिक सत्कार करण्यात आला.

 

—— —— ——- —— —— —— —–
चौकट ——
जावळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले तर आपल्या सर्वांची ताकद वाढणार आहे. सर्वांचा सन्मान राखला जाईल. अशा शब्दात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांनाही मुख्य प्रवाहात येण्याचा निरोप दिल्यामुळे खऱ्या अर्थाने हा माजी आमदार सपकाळ यांचाच प्रवेश नसून भविष्यात अनेक जण जोडले जातील अशी चर्चा सुरू झालेली आहे….

वसंतराव मानकुमरे यांचा खुटा….
जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना या मेळाव्याला चांगलीच जान आणली. जावळीतून लुडबुड करणाऱ्या शिवसेनेच्या नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदमचा खूटा उपटून टाकतो. असे सांगून विरोधकांना चांगलेच डिवचले आहे. त्यामुळे श्री कदम यांना जावळी तालुक्यातील पंचायत समितीला सहा गण व जिल्हा परिषद तीन गटासाठी आता भाजप विरोधात उमेदवार देण्याशिवाय गत्यंतर राहिले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे कोण उमेदवार असतील? त्याची चाचपणी सुरू झाली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button