श्रीरामपूर/माळेवाडी:-रघुनाथ पाटील,बच्चू कडू सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नऊ वर्षानंतर निर्दोष मुक्तता.
पत्रकार संजय पगारे श्री रामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

रघुनाथ पाटील,बच्चू कडू सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नऊ वर्षानंतर निर्दोष मुक्तता.

माळेवाडी प्रतिनिधी ( RPS स्टार न्यूज ):-
काल दिनांक सहा जानेवारी २०२६ रोजी एफ आय नंबर ९७/२०१७ सेशन केस नंबर ८२/२०१९ नुसार आंदोलन शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा.रघुनाथ पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे मा.बच्चू कडू शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, राज्यसचिव रुपेंद्र कालेर, शेतकरी संघटनेचे माजी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पटारे , जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे, प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष अजय बारस्कर, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, विलास कदम सह डॉ . शंकर मुठे, भाऊसाहेब मुठे , शिवाजी मुठे, भिकचंद मुठे, चांगदेव मुठे, रमेश मुठे, रघुनाथ मुठे पाराजी शिंदे, भास्कर शिंदे बरोबर इतर शंभर शेतकऱ्यांवर वडाळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड व काळे फासने प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३५३,१४३,१४७, १४९व ४२७ अन्वय गुन्हे दाखल झाले होते. सदर प्रकरणी न्यायालयात सात वर्ष सरकारने खटला चालवून सुनावणी प्रत्येक महिन्याला सुरू होते. अखेरश्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचें न्यायमूर्ती सिद्धार्थ साळवे यांनी नऊ वर्षांपूर्वी दाखल झालेला खटला काल निकाली काढून सर्व आंदोलक नेत्यांची व शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. याबाबत न्यायालयाच्या निकालाचे सर्वत्र स्वागत होत असून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ साळवे यांचे आभार व्यक्त होत आहे. सदर खटला चालविण्यासाठी श्रीरामपूर बारचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. संदीप चोरमल, ॲड. बाबासाहेब मुठे, ॲड सर्जेराव घोडे, ॲड. प्रशांत कापसे यांनी विना मोबदला आंदोलकांच्या केसेस चालविल्या त्यांचेही शेतकरी वर्गातून आभार व अभिनंदन व्यक्त केले केले आहे.
यावेळी श्रीरामपूर बारच्या वतीने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय रघुनाथ दादा पाटीलसह प्रहार चे बच्चूभाऊ कडू यांचा सत्कार बारचे अध्यक्ष एडवोकेट संदीप चोरमल व ज्येष्ठ विधीतज्ञ एडवोकेट दादासाहेब औताडे यांनी केला. तसेच श्रीरामपूर बारचे नूतन अध्यक्ष एडवोकेट संदीप चोरमल यांचा सत्कार रघुनाथ दादा पाटील व बच्चुभाऊ कडू यांनी करावा अशी सूचना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आणली.
सन 2017 मध्ये रघुनाथ दादा पाटील व बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा यासाठी सीएम नागपूर (फडणवीस) टु पीएम वडनगर गुजरात (मोदी) अशी आसूड यात्रा शेतकरी जनजागरणासाठी काढली होती. संबंधित यात्रा जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांनी श्रीरामपूर येथेल आझाद मैदान येथे आयोजित केली होती. सदर कार्यक्रमांमध्ये एनडी शाखेच्या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यामुळे आदल्या दिवशी यांनी शाखेच्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या समवेत मुठेवाडगावच्या शेतकऱ्यांनी वडाळा पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन पाणी न मिळाल्यामुळे पाणी मिळण्याची मागणी केली होती.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांमध्ये ‘पेटून घेऊ अथवा पेटून देऊ’अशा आशयाचे पहिल्या पानावर मथळे छापून आले.
सदर वर्तमानपत्राच्या बातम्या वाचून रघुनाथ दादा पाटील व बच्चुभाऊ कडू संतापले. कार्यक्रम आटोपल्यानंतर श्रीरामपूर येथून आसूड यात्रा कोपरगावच्या दिशेने जाणार होती. दरम्यान रूपेंद्र काले यांच्या संकेत नर्सरीवर वाकडी फाटा येथे भोजनासाठी व्यवस्था केली होती.
त्यामुळे सदर यात्रा वडाळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोरून गेली असता अज्ञात लोकांनी कार्यालयावर आंदोलन केले.
परंतु पोलीस प्रशासनाने संघर्ष यात्रेतील नेते आयोजक व निवेदन दिलेल्या शेतकऱ्यांवर पाणी न देता खोटे गुन्हे दाखल केले होते.
श्रीरामपूर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्रातून (सांगली) व विदर्भातून (अमरावती) येथून शेतकरी संघटनेच्या व प्रहारच्या नेत्यांना नऊ वर्ष न्यायालयीन संघर्ष करावा लागतो लागतो. ही तालुक्यातील सत्तेत असलेल्या राजकीय नेत्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या बाबत असवेदनशील बाब असल्याचे दिसून येते.




