कोरेगाव:-जिहे कठापूर योजनेच्या फेर जल नियोजन लाभासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जिहे कठापूर योजनेच्या फेर जल नियोजन लाभासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा…

कोरेगाव दि: कृष्णा नदीवर कृष्णा प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता १९६७ साली काँग्रेस राजवटीमध्ये मिळाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने१९९५ साली महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती झाली. आज खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाला न्याय मिळाला.जिहे कठापूर योजनेच्या फेर जल नियोजन लाभासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे सुद्धा उघड झाले आहे.
आता सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने हा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जिहे कठापूर योजनेच्या फेर जल नियोजनाला मान्यता तीन महिन्यापूर्वी मिळाली होती. या मान्यतेने खऱ्या अर्थाने ३१ जानेवारी २०२० रोजी मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक मान्यवरांनी यासाठी पाठपुरावा केला होता . कोरेगाव तालुक्यातील आंबवडे, किन्हई, चंचळी, खेड, जांब खुर्द, हिवरे, कवडेवाडी, भोसे, चिमणगाव, भंडारमाची , भाडळे, या गावांना सिंचना पाणी गुरुवर्य कैवारी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेतून उपलब्ध करण्यात यावे. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार केली होती. याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने ०.५९ अब्ज घनफुट पाणी द्वारे सिंचन प्रस्तावित झाले आहे.
सदर योजनेचे पाणी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचवण्यासाठी काही कालावधी वाट पाहावी लागणार आहे. सध्या श्रेयवाद रंगला असला तरी जिहे कठापुर उपसा सिंचन योजनेचे पाणी वापर सुरुवातीला ३.१७ अब्ज घनफूट होते. त्यानंतर ५.७४२ अब्ज घनफूट आणि आता वांगना प्रकल्पाचा समावेश केल्यामुळे हेच मंजूर पाणी वापर ६.३३२ अब्ज घनफूट सुधारित प्रस्तावित पाणी वापर मंजुरी मिळाली आहे . या विस्तारित कामाची निविदा शासन स्तरावर प्रक्रिया म्हणून सुरू झाली आहे. वास्तविक पाहता एवढ्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला विलंब झाल्याने त्याबाबत कोणीही श्रेयवाद घेत नसला तरी झालेल्या प्रशासकीय कामाची व निविदा प्रसिद्धीबाबत तर महाविकास आघाडीच्याही नेत्यांचा त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे.
वास्तविक पाहता कोरेगाव मतदार संघातील वंचित गावांना पाणीपुरवठ्याच्या बऱ्याच योजना फोल ठरले आहेत. शासनाचा निधी खर्च झाला असला तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. या योजनेच्या साहित्य भंगार मध्ये अनेकांनी ढापले आहे. त्याबाबत श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे. कारण, कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम करावेच लागते. कारण तशा प्रकारे जाहीरनाम्यातून नमूद केले आहे. त्यामुळे कुणी उपकाराची भावना निर्माण करू नये. तसेच या योजनेतून अल्पभूधारक, दलित, कष्टकरी, शोषित व गावकुसाबाहेरील लोकांच्याही एकर दीड एकर शेत जमिनीचा समावेश व्हावा. अशी रास्त मागणी कोरेगाव खटाव तालुक्यातील शेतकरी तसेच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी केली आहे. सध्या ठेकेदारीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा पाटबंधारे विभाग जनतेच्या कल्याणकारी योजनेबाबत ठेकेदारांची मर्जी राखण्यासाठी काहीजण कामाची निविदा प्रसिद्ध केल्याचे सांगत आहेत. असही राजकीय आरोप सुरू झालेला आहे. शेतकरी संघटने कडून सुद्धा टीका होऊ लागलेली आहे.
सध्या कोरेगाव मतदार संघातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. एका बाजूला श्रेय वाद्याचा आणि दुसऱ्या बाजूला लोकसभेमध्ये भाजपच्या खासदारांच्या विरोधात ज्यांनी काम केले. त्यांना उमेदवारी देणार नाही. असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या मतदार संघातील कोरेगाव- खटाव तालुक्यात भाजप लोकसभेच्या उमेदवाराचा पराभव झाला. याची नैतिक जबाबदारी सुद्धा त्यांनी घेऊन आत्मचिंतन करणे गरजेचे होते. परंतु, त्याबाबत दिशाभूल केली जात आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. ज्यांचा पक्ष वेगळा आणि राजकीय काम इतर पक्षाचे करणाऱ्या कोरेगावातील लोकप्रतिनिधींनी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक पक्ष.. एक नेता.. एक उमेदवार या तत्त्वानुसार राहणार का? याचा जनतेसमोर खुलासा करावा. अशी मागणी पुढे आलेली आहे. हा राजकीय विषय असला तरी त्या पाठीमागे निष्ठा महत्त्वाची आहे. असे काही जण नमूद करत आहेत.
निवडून येण्यासाठी शिवसेना चिन्ह आणि भाजपच्या ठेकेदारांसाठी काम… हा दुटप्पी धोरण चालणार नाही. असा इशारा सामान्य शिवसैनिकांनी दिला असून त्याबाबत त्यांनी वरिष्ठांनाही तक्रार केल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मंजूर झालेली विकास कामांबाबत निधीची किती तरतूद करण्यात आली ? काम केव्हा पूर्ण होणार? हे सुद्धा शेतकऱ्यांना सांगावे अशी विनंती करण्यात येत आहे.




