ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नवी मुंबई:-घणसोली मध्ये सेनेच्या सौरभ शिंदेंच्या पाठीशी उपमुख्यमंत्र्यांची शक्ती…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

घणसोली मध्ये सेनेच्या सौरभ शिंदेंच्या पाठीशी उपमुख्यमंत्र्यांची शक्ती…

नवी मुंबई दि: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या घणसोली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये युवा नेते सौरभ ऋषिकांत शिंदे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे माथाडी कामगार व मतदार आणि प्रचारक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या मताधिक्य साठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते आदरणीय एकनाथ शिंदे यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक तसेच मतदारांची संपूर्ण शक्ती युवा नेते व उमेदवार सौरभ शिंदे यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र दिसत आहे. बालपणापासूनच या घणसोली प्रभाग क्रमांक नऊ मधील अनेक विकास कामे तसेच जडणघडणीमध्ये शिंदे कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. सामाजिक कार्यातून पुढे आलेले श्री सौरभ शिंदे यांच्या उमेदवारीने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा धनुष्यबाण अधिकच ताणला गेल्यामुळे मताधिक्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घणसोली प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदारसंघांमधील अनेक गृहनिर्माण सोसायटी तसेच स्थानिक भूमिपुत्र माथाडी कामगार आणि शिवसैनिक अशा त्रिवेणी संगमामुळे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये रंगत आलेली आहे. रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र नेते श्री रमेश अनिल उबाळे, विशाल भोसले, नितीन रोकडे, जमीर भोसले यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते एका दिलाने काम करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो मुळे सर्व नवी मुंबईमध्ये भगवे मय वातावरण झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकीर्दीतील भगवे मय वैभवशाली इतिहास पुन्हा एकदा घणसोली रस्त्यावर दिसून आला. ज्येष्ठ शिवसैनिकांनी जुन्या आठवणी सांगत खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनी रोड शो च्या माध्यमातून दिलेला शुभ संकेत यशस्वी ठरेल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रोड शोच्या माध्यमातून शिवसेनेची एकजूट व मित्रपक्षाने दिलेली साथ तसेच स्थानिक भूमिपुत्रांनी शिंदे शाही बद्दल दाखवलेला विश्वास यामुळे प्रचारकांचाही उत्साह वाढलेला आहे. घणसोली येथील माता भगिनींनी दिलेला आशीर्वादामुळे श्री सौरभ शिंदे यांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांच्या कार्याची माहिती सर्व मतदारसंघापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांच्या मताधिक्याबाबत उत्सुकता लागलेली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button