कराड:-श्री शिवाजी विद्यालय, कराड, विभाग स्तरीय क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्री शिवाजी विद्यालय, कराड, विभाग स्तरीय क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

कराड:- 17 वर्षाखालील शालेय शासकीय क्रिकेट स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय, कराडच्या खेळाडूंनी अतुलनीय यश मिळवले. छ. शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय, कराडने सर्व संघांवर मात केली. राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा शिर्डी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून, या यशाबद्दल सर्व विद्यार्थी खेळाडूंचे व संघ व्यवस्थापक श्री. जी.डी. सुकम तसेच श्री. ए. डी. झांबरे, क्रीडा विभाग प्रमुख सौ. व्ही. आर.पवार यांचे संस्थेचे अध्यक्ष व सचिव मा. श्री. जयंत (काका) पाटील, खजिनदार मा. श्री. संजय बदियाणी साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.टी. डी. जाधव, सर्व शिक्षक- शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




