श्रीरामपूर:-गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर पथकाची कारवाई धरपकड सत्र सुरू
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर पथकाची कारवाई धरपकड सत्र सुरू.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) दिनांक २९ / ११ / २०२५ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर येथे मा .श्री सोमनाथ वाकचौरे ‘ अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की ‘ दोन ईसम नाने साहिल शकिल पिंजारी रा . मोरगे वस्ती वार्ड नं 07 श्रीरामपुर जि अहिल्यानगर हा त्यांचा साक्षीदार हे नॉर्दन ब्रॅन्च चौक ते डावखर चौक जाणाऱ्या रोडवर टावर चौक परिसर वार्ड नं 07 मोरगेवस्ती श्रीरामपुर येथे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली असता मा.अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे श्रीरामपुर यांनी लागलीच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकातील पोलीस अंमलदार पो हे कॉ दादासाहेब लोढे . पो . ना . संदीप दरंदले ‘ पो कॉ राजेंद्र बिरदवडे ‘ पो. कॉ.सहदेव चव्हाण,पो. कॉ.अशोक गाढे यांना सुचना देवून पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर यांची मदत घेवून कारवाई करणेबाबत सूचना देवून पथकास रवाना केले
वरील पथकाने खाजगी वाहनाने पंचासह सदर ठिकाणी जावून खात्री केली असता त्या ठिकाणी दोन इसम हे संशयीतरीत्या फिरताना मिळून आले . त्यांना ताब्यात घेवून पोलीस असल्याची ओळख पटवून देवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1 ) साहि ल शकिल पिंजारी वय २३ वर्षे रा मोरगेवस्ती वार्ड नं 07 ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर २) एक विधीसंघर्षित बालक असल्याचे समजले त्यांस त्यांच्या अंगझडतीचा उद्देश सजावून सांगून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तल व एक जिवंत काडतुस मिळून आले त्यांना विश्वासात घेवून विचासपुस केली असता त्यांनी सांगितले कि . सदर पिस्तुल विक्री करण्याच्या उद्देशाने आणले असल्याचे सांगितले तसा सविस्तर पंचनामा करून ते जप्त करण्यात आले . त्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु . र . नं 1054 / 2025 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 /25 .7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी नामे साहिल शकिल पिंजारी वय २3 वर्षे रा मोरगे वस्ती वार्ड नं 07 ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीवर खालील प्रमाणे गुन्हा दाखल आहे
अ . नं पोलीस स्टेशन श्रीरामपुर शहर गुन्हा रजि . नंबर 08 / 2025 कलम भा . न्या .सं . 118 ( २) ‘ 352 . 352 ‘ 351 ‘ ( २) प्रमाणे
शस्त्र सुधारणा अधिनियम २०19 चे कलम 09 नुसार कोणत्याही अल्पवयीन बालकास अग्निशस्त्र विकणे . त्याच्या ताब्यात देणे आदि बाबींसाठी गंभीर शिक्षा नमुद केली आहे सदर अधिनियमाच्या कलम 25 (8) ‘ 29 नुसार सदरच्या अपराधास जन्मठेप पर्यंत शिक्षा आहे . सदर बाबत सविस्तर तपास करून वाढीव कलम लावण्यात येत आहे.


सदर गुन्ह्यांतील आरोपी याने सदरचे अग्निशस्त्र हे कोणाकडून आणले होते ? तसेच कोणास विक्री करणार होते ? अगर कोणता उद्देश होता ? याबाबत तपास करत आहोत.
सदरची कारवाई ही मा. श्री सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधिक्षक ‘ अहिल्यानगर श्री सोमनाथ वाघचौरे ‘ अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री जयदत्त भवर ‘ उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पो . नि नितीन देशमुख ‘ सपोनि गणेश जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर कार्यालयातील पोसई चारूदत्त खोंडे, पो. हे. कॉ. दादासाहेब लोंढे,पो.ना . संदीप दरंदले,पो.कॉ राजेंद्र बिरदवडे,पो. कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ.अशोक गाढे,मोबाईल सेलचे पो.हे. कॉ सचिन धनाड, पो.ना रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पो .कॉ रविंद्र अभंग यांनी केली आहे.




