ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कुडाळ गटात संधी साधूंच्या पराजयासाठी मतदारांमध्ये जागृती…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कुडाळ गटात संधी साधूंच्या पराजयासाठी मतदारांमध्ये जागृती…
कुडाळ दि: कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये सध्या नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत . असे असतानाच मी नाहीतर कुणी नाही असे आर्थिक बळावर संधी साधू सरसावले आहेत. त्याच्या दुपटीने कुडाळ जिल्हा परिषद गटात स्वाभिमानी मतदारांमध्ये जागृती सुरू झाली आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक साहेबराव पवार यांनी आपला करिष्मा कायम ठेवला होता. त्यांची गुप्त ताकद नेहमीच चर्चेचा विषय ठरली असली तरी कुडाळ जिल्हा परिषद गट यापूर्वीच्या निवडणुकीत तडजोडीचे राजकारण ज्यांनी केले. त्यांना धडा शिकविण्यासाठी सायगाव , आनेवाडी, कुडाळ येथील काही स्वाभिमानी मतदारांनी मोट बांधली आहे. विकास कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले वसंतराव मानकुमरे व सौरभ शिंदे, दादा पाटील, प्रवीण देशमाने यांच्यासह काही मातब्बर सक्षम आहेत.
कुडाळ गट इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव झाल्यापासून काहींची राजकीय इच्छाशक्ती उफाळून आलेले आहे. यामध्ये गैर काहीही नाही कारण लोकशाहीने सर्वांनाच अधिकार दिले आहेत. तसेच जबाबदारीने सुद्धा इतर मागासवर्गीय चळवळीत सक्रिय सहभागी घेण्याची ही दानत लागते. ही दानत काहींच्या मध्ये नसल्याने त्यांच्या बद्दलची नाराजी उघड पणे व्यक्त केली जात आहे.
कोणतेही सामाजिक काम नसतानाही बॅनरबाजी व जाहिरातबाजी म्हणजेच सामाजिक सेवा असा चुकीचा अर्थ ते स्वतःहून काढत असले तरी त्यांना प्रतिसाद देणारी हुकमी संजीवनी मिळत नाही. उलट अशा प्रवृत्तीला कुडाळ भागात ठेचण्याची वेळ आता आली आहे.
सुदैवाने संविधानाच्या माध्यमातूनही कुडाळ जिल्हा परिषद गट हा इतर मागासवर्गीय कर्तबगार महिलेसाठी संधी चालून आली आहे. कुडाळ जिल्हा परिषद गट हा नेत्यांच्या आदेशाने वागणारा गट म्हणून सातारा जिल्ह्यात परिचित आहे. परंतु यंदाच्या २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळ जिल्हा परिषद गटांमध्ये एका धन दांडग्या व संधी साधू विरोधात सर्वत्र वास दरवळत आहे. मतदारांच्या मध्ये संपर्क ठेवून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विकास कामे आणणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी सध्या तरी कुडाळ व आनेवाडी ,सायगाव, रिटकवली परिसरातील कार्यकर्ते आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजप नेते
शिवेंद्रसिंहराजे भोसले ज्यांना उमेदवारी देतील. त्यांचा विजय सोपा असेल तरी सुद्धा आता आ. शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे कुडाळ मध्ये स्वतंत्र दोन गट एकमेकांच्या जिरवाजीरवी खेळात सामील झाले आहेत. ही सदृढ लोकशाहीची लक्षणे आहेत.




