ताज्या घडामोडी
मुंबई:-राजभवन येथे महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री पदासाठी श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देणारे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
मुंबई दि.4
आज राजभवन येथे महामहिम राज्यपाल मा.श्री. सी.पी.राधाकृष्णन जी यांच्याकडे महायुतीच्या वतीनं सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महायुतीतील इतर घटक पक्षांतर्फे मुख्यमंत्री पदासाठी श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देणारे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री मा. निर्मला सीतारामन, श्री. विजय रूपानी, श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. एकनाथ शिंदे, खासदार श्री. प्रफुल्ल पटेल, खासदार श्री. सुनील तटकरे, खासदार श्री. अशोक चव्हाण, माजी खासदार श्री. रावसाहेब दानवे पाटील यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.