पारनेर:-भूमि अभिलेख कार्यालयातील बेकायदेशीर वृक्षतोडीवरून वन विभागाने हात झटकले; चेंडू नगर पंचायतीच्या कोर्टात.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-भूमि अभिलेख कार्यालयातील बेकायदेशीर वृक्षतोडीवरून वन विभागाने हात झटकले; चेंडू नगर पंचायतीच्या कोर्टात.

पारनेर (राजकुमार इकङे)पारनेर भूमि अभिलेख कार्यालयाच्या आवारातील सीताफळ, रामफळासह इतर मौल्यवान झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी मनसे तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी केलेल्या तक्रारीवर वनपरिक्षेत्र अधिकारी पारनेर यांनी अखेर उत्तर दिले आहे. मात्र कारवाई करण्याऐवजी वन विभागाने जबाबदारी नगर पंचायतीवर ढकलली आहे.
काय आहे प्रकरण?
दिनांक २१/०८/२०२६ रोजी मनसेकडून वन विभागाकडे लेखी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता की, पारनेर भूमि अभिलेख कार्यालयाच्या आवारातील झाडांची परवानगी नसताना कत्तल करण्यात आली असून, संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
या तक्रारीच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी (जी. व्ही. धाडे) यांनी जा.क्र.कक्ष-१/गुन्हे/७३०/सन २०२६-२७, दिनांक २५/०८/२०२६ अन्वये लेखी कळवले आहे की,
> “तालुका भूमि अभिलेख कार्यालय पारनेर हे पारनेर नगर पंचायत हद्दीत येत असल्यामुळे नागरी क्षेत्रातील वृक्षतोड अथवा वृक्षासंबंधी कोणतीही कार्यवाही करणे साठी नगर पंचायत कार्यालयातील वृक्षअधिकारी यांचे कडून केली जाते. संबंधित तक्रार अर्जातील वृक्षतोड ही नागरी क्षेत्रात (नगर पंचायत क्षेत्रात) असल्याने या कार्यालयामार्फत कार्यवाही करता येत नाही. तरी आपण संबंधित विभागाकडे योग्य त्या प्रकारे तक्रार दाखल करावी.”
*मनसेचा सवाल:*
यावर प्रतिक्रिया देताना मनसे तालुका अध्यक्ष अविनाश पवार म्हणाले की, “सरकारी कार्यालयाच्या आवारातच जर अशी बेकायदेशीर वृक्षतोड होत असेल आणि वन विभागच हात झटकत असेल, तर सामान्य माणसाने न्याय मागायचा कुणाकडे? एक विभाग दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवत आहे. आता हीच तक्रार नगर पंचायत, पारनेर यांच्याकडे दाखल केली असून, नगर पंचायत कारवाई करते की कसे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.”
सदर तक्रार अर्ज नगर पंचायत पारनेर येथे आवक लिपिक यांच्याकडे दिनांक २५/०८/२०२६ रोजी दाखल झाला असून, पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





