मुंबई:-महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र राज.
पत्रकार ऋतुजा बर्गे महाराष्ट्र राज्य महिला सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ऋतुजा बर्गे महाराष्ट्र राज्य महिला सचिव
RPS STAR NEWS
महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र राज.
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळुनही सत्ता स्थापनेसाठी दिरंगाई होत होती.याचा शेवट देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री नितीशकुमार, योगी आदित्यनाथ, चंद्राबाबू नायडू त्रिपुरा, मेघालय आसाम राजस्थान आदि राज्यांतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई च्या आजाद मैदानावर हा नयनरम्य सोहळा पार पडला.
मंचकावर नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच उपस्थितांनी मोदी मोदी असा जयघोष केला कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली राज्यपाल मोहोदयांच्या अनुमतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तर श्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करुण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या पाठींब्याने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर श्री अजित दादा पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
शपथ विधी सोहळ्यासाठी साधु महंत चित्रपट अभिनेते अभिनेत्री उद्योजक विविध राज्यांतील मान्यवर उपस्थित होते.