राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सद्रुरु महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सद्रुरु महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न.

श्रीरामपुर / राहाता ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) धनगरवाडी येथे १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सद्गुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून महंत रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले . सप्ताहनिमित्त परिसरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेताना लाखो भाविकांची श्रद्धा आणि उत्साह जवळून पाहायला मिळाला यावेळी महंत रामगिरी जी महाराज यांच्या समवेत सप्ताहस्थळी भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या पालकमंत्री वैद्यकीय कक्षास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली दुरदुरहुन येणाऱ्या भाविकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा वेळीत आणि योग्य पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात . यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली १७९ वर्षांची ही अखंड आध्यात्मिक परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे सुरु आहे हे या सप्ताहाचे मोठेपण आहे लाखो भाविकांची उपस्थिती समाजाचे उत्स्फूर्त पाठवळ आणि भक्ति – शक्तीचे विराट दर्शन घडविणारा हा सप्ताह महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील एक अनोखा सोहळा आहे या सप्ताहा ला मिळणारे व्यापक सामाजिक पाठबळ आणि श्रद्वेची परंपरा गौरवास्पद आहे.

शिर्डी ( उपमाका ) मुख्यमंत्री देवैद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी त्यांचे स्वागत केले आगमन प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील अमोल खताळ आमदार आशुतोष काळे विवेक कोल्हे वैजापुरचे आमदार रमेश बोरनारे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे सत्यजित तांबे ‘ पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
शिर्डी विमानतळ येथुन vमोटारीने श्री धनगरवाडी ता राहाता येथे योगीराज सदगुरू श्री गंगागिरी महाराज १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याकडे मुस्थान झाले
या भूमीला योगीराज गंगागिरी महाराजांच्या तपश्चर्येचा आणि आशीर्वादाचा स्पर्श लाभला आहे महंत रामगिरी महाराजांच्या अमृतवाणीतून भक्तीचा अखंड प्रवाह सुरु आहे हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजाला एकत्र आणणारा भक्ती आणि संस्कारांची ऊर्जा देणारा सोहळा आहे योग्य दिशा देणारा आध्यात्मिक सोहळा आहे महंत रामगिरी महाराज अध्यात्मिक चळवळीचे समाजाला दिशा देण्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे





