सातारा:-यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धांसाठी भरीव आर्थिक तरतूद करा: अनिलकुमार कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धांसाठी भरीव आर्थिक तरतूद करा: अनिलकुमार कदम.

सातारा :- सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा केंद्रस्तर,बीट स्तर, तालुका व जिल्हा अशा चार पातळीवर व्यक्तीगत स्पर्धा व सांघिक स्पर्धा यांचे जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थी यांच्यात क्रीडा कौशल्य विकास होण्यासाठी उदात्त हेतूने आयोजन केले जाते.पण हा उदात्त हेतू सफल होण्यासाठी तुटपुंजी आर्थिक तरतूद ही बालक्रीडा स्पर्धांसाठी व जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थी क्रीडा कौशल्य विकासातील खुप मोठा अडथळा आहे.जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थी यांच्यात क्रीडा कौशल्य विकासातील यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.
याबाबत अनिलकुमार कदम म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा मधील बहुसंख्येने विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण असलेल्या कुटुंबातील असतात.पण विद्यार्थी कला क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करताना दिसतात.शिक्षक, केंद्रप्रमुख प्रामाणिकपणे प्रसंगी पदरमोड करुन विद्यार्थीना बालक्रीडा स्पर्धांसाठी घेऊन येतात.केंद्र,बीट व तालुका, जिल्हा स्तरावर सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा ते स्पर्धा ठिकाणी ने आण करण्याकरिता प्रवास खर्चाची तरतूद करण्यात आली नाही.स्पर्धा ठिकाणी अद्यावत,क्रीडा स्पर्धा नियमावलीनुसार क्रीडांगण विकसित केलेली नाहीत.तशी आर्थिक तरतूद गेल्या कित्येक वर्षांपासून केलेली नाही.बालक्रीडा केंद्र स्तरावर भरविताना केंद्र प्रमुखांना खुप अडचणींचा सामना करावा लागतो.भौतिक सोयी सुविधा,क्रीडा साहित्य उपलब्ध करण्यासाठी केंद्र प्रमुख व शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालक्रीडा स्पर्धा केंद्रस्तर बीट स्तर, तालुका स्तरावर घेताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.यासाठी सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने सर्वसमावेशक बालक्रीडा धोरण व आराखडा तयार करणे आवश्यक आहे.भरीव आर्थिक तरतूद करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष खास बाब म्हणून आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी क्रीडा क्षेत्रातील अभ्यासक जाणकार क्रीडा प्रेमी पालक जनतेची मागणी आहे.
आर्थिक तरतूद करताना प्रथम केंद्र स्तरावर अधिकची तरतूद होणे गरजेचे आहे.कारण केंद्रातील व बीट स्तर स्पर्धा मध्ये अधिक विद्यार्थी सहभागी असतात.तालुका व जिल्हा स्तरावर फक्त विजेते निवडक संघ व विद्यार्थी सहभागी होतात.त्यामुळे आर्थिक तरतूद करताना सर्व प्रथम केंद्र स्तरावर अधिकची तरतूद व बालक्रीडागंणे विकसित करण्यात यावीत.अशी मागणी अनिलकुमार कदम यांनी केली आहे.




