कणकवली:-गोव्याहून मुंबईच्या दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क पथकाने केली कारवाई.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कणकवली:-गोव्याहून मुंबईच्या दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क पथकाने केली कारवाई.
कणकवली:-गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या, गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असलेल्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने कारवाई केली. गुरुवारी सकाळी १०.३० वा. सुमारास ओसरगांव येथील टोलनाक्यानजीक करण्यात आलेल्या या कारवाईत २ लाख ४० हजाराची दारू, ७ लाखांचा ट्रक मिळून ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालक राजबीरसिंह छेदीलालसिंह (४१, मूळ इन्सुली, ता. सावंतवाडी व सध्या रा. ओसरगांव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजबीरसिंह हा मुळचा पंजाबी असल्याची माहिती एक्साईजच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. महामार्गावरून एका ट्रकद्वारे चोटी दारूवाहतूक सुरु असल्याची माहिती एक्साईजच्या कणकवलीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने ओसरागांव टोलनाका गाठला. सकाळी १०.३० वा. सुमारास मुंबईच्या दिशेने जात असलेला एमएच ०७ एजे२३२५ हा ट्रक पथकाने थांबविला. ट्रकचालक राजबीरसिंह विसंगत उत्तरे देत असल्याने एक्साईजच्या पथकाला संशय आला. पथकाने ट्रकचा हौदा उघडला असता आत मध्ये एम आय डी सी मध्ये वापरले जाणारे प्लास्टिक आढळून आले मात्र पुढील पाहणीत प्लास्टिकच्या खाली दारूने भरलेले बॉक्स आढळून आले.




