पारनेर:-दिवसातून चार वेळा पारनेर-सुपा रोडने प्रवास करणारे खासदार, आमदार पारनेर सुपा रोड मुत्युंचा सापळा बनला असताना गप्प का…? मनसे नेते अविनाश पवार.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
दिवसातून चार वेळा पारनेर-सुपा रोडने प्रवास करणारे खासदार, आमदार पारनेर सुपा रोड मुत्युंचा सापळा बनला असताना गप्प का…? मनसे नेते अविनाश पवार.
राजकुमार इकडे( सुपा)पारनेर- सुपा रोडवर आमदारांसह , खासदार दिवसांत चार वेळा प्रवास करताना दिसतात पण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोघेही ब्र शब्द काढायला तयार नाहीत हे पारनेर तालुक्यातील जनतेच दुर्दैवच म्हणावे लागेल पारनेर तालुक्यात प्रशासकिय अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत हे यातुन स्पष्ट होते आहे पारनेर- सुपा रोडवर सुपा एम. आय. डी.सी. मुळे कामरांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते तसेच पारनेर तालुक्याच ठिकाण असल्याने शाळा, कॉलेजसह तहसील कचेरी मुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक चालत आहे आणि रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर अपघात होतात अपंगत्व प्राप्त होऊन कुटुंब उद्ध्वस्त होत असताना ज्यांना जनतेनी निवडणूक दिलं ते काहीही बोलायला तयार नाही विशेष बाब म्हणजे खासदार पण पारनेर मधील आणि आमदार पण पारनेर मधील आणि रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत त्यामुळे दोन दिवसांत जर रस्त्यावरील खड्डे बुजवीले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचे पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.




