श्रीरामपूर:-सुरेश असणे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्यांदाच खानापुर शिवाचे तळे भरले – प्रवीण साळवे
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सुरेश असणे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्यांदाच खानापुर शिवाचे तळे भरले – प्रवीण साळवे
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) सुरेश असणे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्यांदाच खानापुर शिवाचे तळे भरले गेले अनेक वर्षापासून अस्तित्वात असणारे खानापुर शिवालगत असलेले तळे हे जेव्हापासून अस्तित्वात आले तेव्हापासून आज पर्यंत कधीही भरले गेले नाहीत यावर अवलंबून असलेली अनेक शेतकरी व खानापुर फस्टिंग वरील वस्ती पाण्यापासून वंचित राहिली माळवाडगाव व परिसरात अनेक मोठमोठे नेते होऊन गेले परंतु ही बाब किंवा शेतकऱ्यांची चिंता मिटवण्याची कल्पना एकाही राजकारणी नेत्याच्या मनात आली नाही . परंतु शेतकऱ्यांची चिंता लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष सुरेश भाऊ असणे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन तळे भरण्यास विनंती केली या अगोदर देखील या तळ्यात पाणी घेण्यासाठीची चारी नादुरुस्त होती याचा देखील पाठपुरावा करून सुरेश असणे यांच्या प्रयत्नातून पाटबंधारे विभागच्या जेसीबी च्या साह्याने या चारीचा जीर्णोद्धार केला म्हणजे जीर्णोद्धार झाल्यामुळे ही तळे भरली गेली व या तळ्यामध्ये पाणी आल्यामुळे अनेक शेतकरी यांनी मोकळा श्वास घेतला आहे कारण यावर्षी श्रीरामपुर व परिसरात पावसाचे प्रमाण अगदी नगण्य स्वरूपात आहे गावकऱ्यांमध्ये याबद्दल समाधानाचे वातावरण आहे.