मेढा:-विद्यार्थी विकास सेवा संस्थेच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
विद्यार्थी विकास सेवा संस्थेच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
मेढा – शैक्षणिक कार्य गतिमान होण्यासाठी सावली तालुक्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी सावली निर्माण करणाऱ्या विद्यार्थी विकास सेवा संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
म्हाते ब्रु॥ गावच्या विद्यार्थी विकास सेवा संस्थेला रौप्य महोत्सवी वर्ष पुर्ण गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदनीय सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग सपकाळ सचिव श्री चंद्रकांत शेलार आणि खजिनदार श्री तुकाराम गोगावले आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा शैक्षणिक कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत शेलार यांनी स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळावलेल्या मुला – मुलींना सहकार्य या विषयी अनेक वर्षांवर्षी केलेल्या कार्याचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमात सुनंदा शेलार यांनी ग्रंथालयाची जादा पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यास तसेच झाडे लावून जगवण्याऱ्या विद्यार्थ्याला एक हजार रुपयांची दोन बक्षिसे जाहीर केली. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून ही विद्यार्थी विकास सेवा संस्था कार्य करीत आहे.असे श्री दिलीप जाधव यानी मत व्यक्त करून प्रगतीचा दिप ही कविता सादर केली .
या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अनेक संस्थेचे सदस्य व ग्रामस्थांनी देणगी रुपाने लाखो रुपये देऊन जावळी तालुक्यात या पुढेही अनेक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विकास कामाना प्राधान्य देऊन गावच्या प्रगतीत हातभार लावावा. अशी मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी म्हाते गावातील जेष्ठांचा, विद्यार्थी, पोलीस, डॉक्टर, बी ई कॅम्यूटर इंजिनियर मध्ये प्राविण्य मिळविलेल्या मुला मुलींचा सत्कार करण्यात आला. तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा या मधील सर्वच विद्यार्थांना स्कुल बॅग, स्मार्ट वॉच व खाऊ देण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सदस्य श्री पांडुरंग सपकाळ यांनी केले.
या कार्यक्रमाला जावळीचे विद्यमान गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, रमेश चव्हाण, खरमाटे मॅडम, दिलीप जाधव, हनुमंत शिंगटे, आनंदराव सपकाळ, किसन सपकाळ,संपत सपकाळ, के.डी. सपकाळ, रविंद्र सपकाळ, सुर्यकांत सपकाळ, दत्ता सपकाळ, संपत पाटणे, वसंत सपकाळ, तेजेस शेडगे,कृष्णा सपकाळ, समीर गोगावले, आनंदा सपकाळ, ज्ञानदेव सपकाळ, विजय धनावडे, अमित सपकाळ, अक्षय गोगावले, सरपंच किसन कांबळे, उपसरपंच अशोक सपकाळ आदी मान्यवर व म्हाते ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी विनोद शिंगटे यांनी आभार मानले.