महाबळेश्वर तालुक्यात आमशी गावचे सुपुत्र भाऊसाहेब मोरे यांचा वाढदिवस म्हणजे ताकदीचा इशारा – नेतृत्व, निष्ठा आणि शक्तीचे जंगी प्रदर्शन.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाबळेश्वर तालुक्यात आमशी गावचे सुपुत्र भाऊसाहेब मोरे यांचा वाढदिवस म्हणजे ताकदीचा इशारा – नेतृत्व, निष्ठा आणि शक्तीचे जंगी प्रदर्शन.

महाबळेश्वर तालुक्यात दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी भाऊसाहेब मोरे यांचा वाढदिवस त्यांच्या तळदेव येथील रिसोट पिकाॅक पाॅईंट येथे साजरा करण्यात आला.वाढदिवस साजरा होणे हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तालुक्यातील राजकीय समीकरणे हादरवणारा आणि विरोधकांना थेट इशारा देणारा शक्तीप्रदर्शनाचा सोहळा ठरला. कार्यकर्त्यांचा उत्साह, नेत्यांची, कार्यकर्तेयांची उपस्थिती आणि घोषणांचा कडकडाट पाहता संपूर्ण परिसर भारावून गेला.
या कार्यक्रमास कोयना–सोळशी–कांदाटी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत ढाल, तालुका अध्यक्ष आदरणीय बाबुराव दादा सकपाळ यांची ठाम उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीनेच कार्यक्रमाचे वजन अनेक पटींनी वाढले. सोबतच माजी सभापती, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य धोंडीबा जंगम यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला.
महाबळेश्वर तालुक्याचा निर्भीड, बुलंद आणि थेट आवाज माजी सभापती संजूबाबा गायकवाड, विठ्ठल जाधव तळदेव गावचे सरपंच रामचंद्र जंगम उभाटागटाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष आप्पा जाधव व महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष राजू घाडगे यांच्या उपस्थितीने हा वाढदिवस कार्यक्रम राजकीय शक्तीचे खुले प्रदर्शन ठरला.
भिमक्रांती युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष भालेराव यांनी युवकांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत वातावरण तापवले.
कोयना–सोळशी–कांदाटी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संतोष मोरे, सागर कदम, संजय उतेकर, मांगर गावचे लोकप्रिय सरपंच गणेश जाधव, नाना जाधव, तसेच दीपक जाधव,किरन जंगम , मनोज मोरे, संदिप मोरे महाबळेश्वर एस.टी. डेपोचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनतेचा विश्वासु जिंकलेले ड्रायव्हर संदेश घाडगे यांची उपस्थिती म्हणजे भाऊसाहेब मोरे यांच्यावरील विश्वासाचा ठाम ठसा होता .
फुलांचा वर्षाव, केक कापणी, टाळ्यांचा गजर आणि घोषणांनी स्पष्ट संदेश दिला भाऊसाहेब मोरे हे नाव केवळ वाढदिवसापुरते मर्यादित नसून, आगामी काळात महाबळेश्वर तालुक्यात निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व आहे.
हा कार्यक्रम म्हणजे एकजूट, निष्ठा आणि ताकदीचा एल्गार असून, महाबळेश्वर तालुक्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची दणक्यात घोषणा असल्याचे बोलले जात आहे.




