पारनेर:-शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी प्रश्नांवर रुपेश ढवण यांचे दि. २० पासून उपोषण.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी प्रश्नांवर रुपेश ढवण यांचे दि. २० पासून उपोषण.

पारनेर -तालुका (राजकुमार इकडे) – शेतकऱ्यांचे कर्जमाफी , कांदा भाव वाढ व निर्यात धोरण आणि इतर प्रश्नांसंदर्भात आपली माती , आपली माणसं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश ढवण हे बुधवार दि . २० पासून शेतकऱ्यां समवेत शेतकऱ्यांसाठीच्या आर पार लढाई करिता आमरण उपोषणाला बसणार आहेत .
युवा शेतकरी नेते रुपेश ढवण यांनी नुकतेच ४ दिवस यशस्वी अन्न त्याग आंदोलन केले . त्या आंदोलना ला राज्यभरातून शेतकरी , वारकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभरात झाल्याने राज्य विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्ज माफी जाहीर केली , निवडणूक होवून वर्ष पुर्ण होत आले , आश्वासन पाळले नाही , राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कांदा भाव वाढ , त्यासाठी बांगला देश व इतर देशात कांदा निर्यात धोरण राबवण्यासाठी निर्यात खुली करावी , इतर शेती मालाला हमी भाव मिळावा म्हणून रुपेश ढवण यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला .
बुधवार दि . २० पासून शेतकरी पुत्र रूपेश ढवण हे आमरण उपोषणाला बसणार असून त्यांच्या समवेत युवा कार्यकर्ते महेंद्र पांढरकर , देवराम लामखडे , पोपट तनपुरे , कचरू वरखडे , बाबाजी पठारे , दादा वराळ , संतोष लामखडे, संजय तनपुरे , अशोक शेटे , राजेंद्र वाळुंज , सोनी ताई पवार , नंदाबाई वरखडे , साखराबाई वरखडे , हिराबाई वराळ , बबिता काळे , शोभा ढवळे व इतर शेतकरी साखळी उपोषण करणार आहेत .
यावेळी शेतकरी पुत्र रूपेश ढवण यांचे आमरण उपोषणाला बसणार असून बुधवार दि . २० पासून ते शुक्रवार दि . २९ पर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ७ . १५ वाजेपर्यंत हभप अशोक कानडे महाराज , हभप तुषार गुंड , हभप धनंजय गोरडे , हभप बाळासाहेब पठारे , हभप सर्जेराव मस्कर , हभप बाबा खामकर , हभप श्रीराम घुले , हभप पोपट तनपुरे , हभप श्रीहरी पवार महाराज यांचे हरी प्रवचन होणार असून वेळेनुसार विविध गावातील भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे , तदनंतर रात्री ७ . ३० ते ८ . ३० वाजेपर्यंत थोर अन्नदात्यांच्या लोकसहभागातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.




